Pune : तरसाचा दोघांवर हल्ला, हल्ल्याचा थरार मोबाईल कॅमेरात कैद
स्मिता शिंदे, पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात खरपुडी या गावात एका तरसाने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्याचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. एका वृद्धावर तरसाने हल्ला केला. त्यानंतर एक तरूण लगेच त्या वृद्धाच्या मदतीला धावून आला. त्याच्यावरही तरसाने हल्ला केला. पण या तरूणाने हिंमत दाखवून काठीने त्याला मारलं, ज्यानंतर हे तरस पळू लागलं. सैरावैरा धावणाऱ्या […]
ADVERTISEMENT
स्मिता शिंदे, पुणे
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात खरपुडी या गावात एका तरसाने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्याचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. एका वृद्धावर तरसाने हल्ला केला. त्यानंतर एक तरूण लगेच त्या वृद्धाच्या मदतीला धावून आला. त्याच्यावरही तरसाने हल्ला केला. पण या तरूणाने हिंमत दाखवून काठीने त्याला मारलं, ज्यानंतर हे तरस पळू लागलं. सैरावैरा धावणाऱ्या या तरसाची अज्ञात वाहनाला धडक लागली. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली आहे.
कॅमेरात कैद झालेल्या या व्हीडिओमध्ये एक वृद्ध गृहस्थ पायी निघालेले दिसतात. त्यावेळी शेजारी असलेल्या झुडुपांमधून अचानक हे तरस बाहेर आलं. पायी निघालेल्या वृद्ध माणसाचा हात त्याने जबड्यात पकडला. तेवढ्यात गावातले जे तरूण काठी घेऊन तरसाच्या शोधात होते त्यातला एक तरूण तिथे आला. त्याने काठीने या तरसाला फटके मारले. त्यानंतर हे तरस पळाले.
हे वाचलं का?
या सगळ्या झटापटीत तरसाने आणखी एका व्यक्तीचा चावा घेतला. तरस बावरून गेलं होतं. त्याने जसा हल्ला अचानक केला त्याचप्रमाणे त्याला काठीचा प्रसाद मिळेल याची कल्पना नसावी. ते घाबरून सैरावैरा पळालं तेव्हा एका वाहनाची या तरसाला धडक लागली आणि त्याच्या तोंडाला जबरदस्त मार लागला. ज्यानंतर जखमी झालेल्या या तरसाचा मृत्यू झाला अशी माहिती खेड वन विभागाने दिली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT