म्हशींनी केला घात, भीषण बाइक अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाली (रायगड): सुधागड तालुक्यातील पाली नांदगाव मार्गावर म्हशीला ठोकर लागून झालेल्या मोटारसायकल अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

नांदगाव पाली रोडवर शर्मा फार्म हाऊसच्या समोर हा भीषण अपघात घडला. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, रमेश शांताराम पवार (वय 24 वर्ष) हा आपल्या ताब्यातील डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम एच 06 बी एच 6455 चालवत मागील सीटवर संतोष पवार याला घेऊन जात होता.

पाली रोडवर नांदगाव गावच्या हद्दीत शर्मा फार्म हाऊससमोर अचानक रस्त्यात काही म्हशी आडव्या आल्या. त्यामुळे तुफान वेगात असणाऱ्या रमेशला आपली दुचाकी नियंत्रित करता आली नाही अन् त्याने समोरच्या म्हशींना धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात रमेशचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

या घटनेत रमेश शांताराम पवार याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या नाका तोंडातून व डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या संतोष पवार याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथून मुंबईला नेत असताना त्याचा देखील रस्त्यातच मृत्यू झाला.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात, जीव वाचल्यानंतर भावूक पोस्ट करत म्हणाल्या…

ADVERTISEMENT

या घटनेची पाली पोलीस स्थानकात मोटार अपघात 04/2022 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाली पोलिस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नाईक एस एन फडताडे करीत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT