Uddhav Thackeray Speech : ‘अरे त्याला मोठा तर होऊदे’; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा ‘नातू’ही काढला
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोले लगावले. ठाकरेंनी शिंदेंना गद्दार संबोधत थेट नातवावरूनही टीका केली. यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची तुलना कटप्पाशी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापही येतो की, जेव्हा मी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो. बोटंही हालत नव्हती. तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती. ते कटप्पा (एकनाथ […]
ADVERTISEMENT
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोले लगावले. ठाकरेंनी शिंदेंना गद्दार संबोधत थेट नातवावरूनही टीका केली. यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची तुलना कटप्पाशी केली.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे म्हणाले, “वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापही येतो की, जेव्हा मी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो. बोटंही हालत नव्हती. तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती. ते कटप्पा (एकनाथ शिंदे). कट करणारे आप्पा म्हणजे कटाप्पा. कट करत होते. हा पुन्हा कसा उभा राहू शकणार नाही. पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण, त्यांना कल्पना नाहीये की हा उद्धव ठाकरे नाही. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“ज्यांना आपण सगळं काही दिलं. मंत्रिपद, आमदारक्या, खासदारक्या, सगळं काही दिलं, ते निघून गेले. ज्यांना काही देऊ शकलो नाही आणि ज्यामुळे दिलं ते आजही निष्ठेने माझ्यासोबत आहेत. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे की ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. ही शिवसेना एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे”, असं म्हणत शिंदे गटावर उद्धव ठाकरेंनी तोफ डागली.
हे वाचलं का?
“जोपर्यंत तु्म्ही आहात माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. मी पक्षप्रमुख पदी राहायचं की नाही हे तुम्ही ठरवणार आहात. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला, तर त्याचवेळी पायऱ्या उतरून घरी निघून जाईन. पण, तुमच्यापैकी कुणीतरी सांगितलं पाहिजे, गद्दारांनी नाही”, असं उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले.
eknath Shinde dasara Melava speech : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नातवावरून काय सुनावलं?
“काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री. कारटं खासदार. कुणाचं आमदार. पुन्हा डोळे लावून बसलेत नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊदे. शाळेत तर जाऊदे. आताच नगरसेवक. पण सगळं काही एकच. माझ्याकडे पाहिजे. मी का झालो होतो मुख्यमंत्री? का केली होती महाविकास आघाडी? ही काय लवपून ठेवण्याची गोष्ट नाहीये. भाजपने पाठीत वार केला म्हणून मी महाविकास आघाडी केली होती. तुम्ही साक्ष आहात. जे केलं होतं, ते बरोबर होतं की नाही. जर मी हिंदुत्व सोडलं असेन, तर तुम्ही मला सांगा. सोडलं का मी हिंदुत्व?”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Speech : यंदाचा रावण डोक्यांचा नाहीये, खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाच्या वर्मावर बोट
तेव्हा तुमची दाढी तोंडात जात होती का?; ठाकरेंचा शिंदेंना सवाल
“जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहिती नव्हतं बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेस मांडीला मांडी लावून बसले. का बोलताना स्वतःची दाढी तोंडात जात होती. घेतली होती ना शपथ इकडे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घेतली होती”, असंही ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT