Uddhav Thackeray: “असा चमत्कार फक्त मोदीच करू शकतात”, ठाकरेंचे चिमटे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Inflation rate in india। Uddhav Thackeray। Narendra Modi। Saamana Editorial। BJP: मोदीनॉमिक्सवर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार, भाजप आणि समर्थकांना खडेबोल सुनावले आहेत. “एरव्ही महागाईबाबत आपले राज्यकर्ते युक्रेन युद्धाकडे बोट दाखवतात. हे युद्ध तर सुरूच आहे. तरीही जगातील महागाई कशी कमी झाली?”, असा सवाल ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपला केला.

जगभरात महागाई कमी झाली असताना भारतात महागाईच्या झळा कायम आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवत ठाकरेंनी मोदी सरकारला सामना अग्रलेखातून चिमटे काढत खडेबोल सुनावले आहेत.

ठाकरे म्हणतात, “महागाईसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या मात्र सत्ताधाऱ्यांचे ढोल फोडणाऱ्या आणि कागदी घोडय़ांना लगाम घालणाऱ्या आहेत. आता तर एका बातमीने महागाई कमी झाल्याच्या दाव्याची पोलखोलच केली आहे. ‘जगात महागाई कमी झाली असली तरी भारतात मात्र ती वाढली आहे,’ अशी ही बातमी आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray: ‘विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते’, ठाकरेंचं मोठं विधान

“युरिया हे खत शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक अत्यावश्यक गोष्ट. त्याचे भाव जगात 47.6 टक्क्यांनी कमी झाले. भारतात मात्र ते 5.2 टक्क्यांनी वाढले आहेत. तीच गोष्ट नैसर्गिक गॅसची. जगात नैसर्गिक गॅस 28.6 टक्के स्वस्त झाला असताना भारतात मात्र थेट 95 टक्के महागला आहे. हे असे कसे घडू शकते?”, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.

‘अनर्थशास्त्र’, ठाकरेंनी मोदी सरकारला काय म्हटलंय?

“दोन-तीन वर्षांत जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी होऊनही त्याचा काहीच फायदा आपल्या देशातील सर्वसामान्यांच्या पदरात पडला नाही. सामान्यांचा खिसा रिकामा आणि सरकारी तिजोरी ‘पेट्रोडॉलर्स’ने भरलेली! याला मोदी सरकार ‘अर्थशास्त्र’ म्हणत असले तरी सर्वसामान्यांसाठी ते ‘अनर्थशास्त्र’च ठरले आहे. कारण जगातील स्वस्ताईचा थोडाफारही लाभ सर्वसामान्यांच्या खिशात पडलेला नाही”, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis: ‘पहाटेच्या शपथविधीचं सत्य..’, फडणवीस काय म्हणाले?

ADVERTISEMENT

ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “एरव्ही महागाईबाबत आपले राज्यकर्ते युक्रेन युद्धाकडे बोट दाखवतात. हे युद्ध तर सुरूच आहे. तरीही जगातील महागाई कशी कमी झाली? म्हणजेच आपल्याकडील महागाईचा युक्रेन युद्धाशी फारसा संबंध नाही. जो संबंध आहे तो केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आहे.”

दरवाढीची वात आणि महागाईचे दिवे; ठाकरेंचे चिमटे

“जगात महागाई, तेव्हा आपल्याकडेही महागाई; पण जगात स्वस्ताई तरीही आपल्याकडे महागाईच! ही मोदी राजवटीचीच ‘देणगी’ म्हणायला हवी. आठ वर्षांपूर्वी महागाईच्या नावाने काँगेसविरोधात ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनीही दरवाढीची ‘वात’ आणि महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले?”, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेंनी मोदी सरकारला डिवचलं आहे.

Thackeray यांच्या बहुमताची सरन्यायाधीशांनी स्वत: केली आकडेमोड, कोर्टात काय लागणार निकाल?

‘मोदीनॉमिक्स’, अंधभक्त… ठाकरेंचं टीकास्त्र

“वादे आणि दावे तर खूप केले, पण जनतेच्या नशिबी ना स्वस्ताई ना दुहाई, लादली ती फक्त महागाईच! ‘मोदीनॉमिक्स’चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई’ या उफराट्या समीकरणावर काय म्हणणे आहे? महागाईचा असाही ‘चमत्कार’ फक्त मोदीच करू शकतात असेच कदाचित ते म्हणतील आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतील”, असं म्हणत ठाकरेंनी भाजप, मोदी सरकार आणि मोदी समर्थकांना सुनावलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT