“डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे”; उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून स्मरण केलं आहे. ठाकरेंनी अग्रलेखात बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला उजाळा देत दिल्लीतील मोदी सरकार आणि भाजपला उपरोधिक भाषेत सुनावलं आहे. सामना अग्रलेखात म्हटलंय की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, ‘महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे […]
ADVERTISEMENT
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून स्मरण केलं आहे. ठाकरेंनी अग्रलेखात बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला उजाळा देत दिल्लीतील मोदी सरकार आणि भाजपला उपरोधिक भाषेत सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखात म्हटलंय की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, ‘महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’ मात्र या दोन्ही दैवतांचा आज राजकारणापुरता वापर करण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे”, असं म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
लोकशाहीवरून मोदींना टोला
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील संवाद लोकशाहीला अभिप्रेत आहे. ज्यांचे सरकारशी चांगले जमते आणि ज्यांची मतभिन्नता आहे त्यांच्यात संवाद व्हायलाच हवा. मात्र केवळ ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या बहुमतवाल्यांचे शासन म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये बहुमतवाल्यांच्या शासनाला विरोधकांची गर्भित व उघड संमती आवश्यक असते. म्हणूनच विरोधकांचा आवाज बंद पाडून तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही”, म्हणत ठाकरेंनी सामना अग्रलेखातून अप्रत्यक्षपणे मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
हे वाचलं का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापुरात उभारला गेला, काय त्याचा किस्सा?
ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलंय की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेने हे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला दिले. पण त्याच घटनेचे अवमूल्यन आज केले जात आहे व घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यास पायदळी तुडवले जात आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. एका महान उदात्त हेतूने बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार केली. पण ती अंमलबजावणीसाठी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर नुकसान होईल, असाही डॉ. आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिला होता. आज त्यांची आठवण येते. त्यांनी प्रखर सत्य सांगितले होते.”
ADVERTISEMENT
दलितांचे पाय धुतल्याने जातीयता नष्ट होणार आहे का? ठाकरेंचा मोदींना सवाल
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते होते असा अपप्रचार जे करतात ते मूर्ख आहेत. डॉ. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक व नेते होते. त्यांची जातीयतेविरुद्धची लढाई समर्थ देशासाठी होती. पण जातीयवाद सत्ताधाऱ्यांच्या रोमारोमांत भिनलेला आहे. पंतप्रधान मोदी काशीला गेले. त्यांनी गंगेत डुबकी मारली व किनाऱ्यावरील तंबूत पाच दलितांचे पाय धुतले. अशाने काय जातीयता नष्ट होणार आहे? डॉ. आंबेडकरांची आठवण अशा वेळी येथे येतच राहील”, म्हणत ठाकरेंनी मोदींना उपरोधिक सवाल केलाय.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात १७ डिसेंबरला विराट मोर्चा
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे. न्यायालये, वृत्तपत्रे, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. अनेक प्रकरणांत कायदे स्वस्थ बसत आहेत”, असं म्हणत ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सद्यस्थितीवर भाष्य केलंय.
बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय -उद्धव ठाकरे
“देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो; परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे. देशाच्या एकसंधतेला तडे जातील असे हे धोरण आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय. लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल! आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करीत आहोत!!”, असं म्हणत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT