हिरोईन नव्हती म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही; उद्धव ठाकरेंचा NCB ला टोला
गेल्या वर्षभरापासून राज्यात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाया चर्चेत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकत अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. या सर्व प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करताना एनसीबीला टोला लगावला. नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या, तर […]
ADVERTISEMENT
गेल्या वर्षभरापासून राज्यात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाया चर्चेत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकत अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. या सर्व प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करताना एनसीबीला टोला लगावला.
ADVERTISEMENT
नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या, तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक केलं. ठाकरे म्हणाले, ‘सध्या जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत. मुंबईमध्ये मुंबई पोलिसांनी/महाराष्ट्र पोलिसांनी चार दिवसांपूर्वी 25 कोटी रुपयांचे हेरोइन पकडलं. हेरोईन पकडलं हिरोईन नाही. पण नुसतं हेरोईन पकडलं. त्यात कोणतीही हिरोईन नव्हती म्हणून पोलिसांचं नावचं आलं नाही. पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे एनसीबीला टोला लगावला.
हे वाचलं का?
वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांची नावं घेण्याची कुणाचीही लायकी नाही-उद्धव ठाकरे
‘महाराष्ट्र पोलिसांची ख्याती देशभर आहे. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला वाटतं हेरोईन पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव करायला हवा, अशी सूचना त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना यावेळी केली.
ADVERTISEMENT
‘आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज फास्ट स्ट्रॅक मुंबई, नागपूर, पुणे येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस, मुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक, केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात व्यूहरचना?
‘महिला व बालक यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजीवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखताना, अशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा कामी येणार आहे’, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT