“उद्धव ठाकरेंना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं” माजी मंत्री सुरेश नवलेंच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बाळासाहेब ठाकरेंनाही भेटलो होतो आणि उद्धवजींना मुख्यमंत्री करावं असा आग्रह केला होता असंही सुरेश नवले यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

माजी मंत्री सुरेश नवले यांनी काय म्हटलं आहे?

माजी मंत्री सुरेश नवले हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ते म्हणाले की १९९६ पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची होती. मात्र ती त्यावेळी पूर्ण झाली नाही. ज्यावेळी महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला तेव्हा त्यांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण झाली. १९९५ मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते तर गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. १९९६ ला मला एका मित्रामार्फत निरोप आला होता. त्यांनी माझ्यासहीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री चंद्रकांत खैरे आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंना भेटलो.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंनीच तो प्रस्ताव घेऊन जायला लावलं होतं

१९९६ ला आम्ही सगळे त्यांना भेटलो आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा असं सांगितलं. आम्हाला उद्धव ठाकरेंच्या आग्रहाखातर जावं लागलं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेचा अंदाज असावा म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. त्यामुळे १९९६ ते २०१९ या कालावधीपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदाचा लोभ होताच. मात्र योगायोगानेच ते मुख्यमंत्री झाले.

शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले

महाराष्ट्रातले राजकारणातले भीष्माचार्य शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असंही सुरेश नवले यांनी सांगितलं. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं हे शक्य होणार नाही. मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंनाच हवं होतं. उद्धव ठाकरे यांची दोन रूपं आहेत. मुझे मिला तो सब भूमि गोपाल की.. नाही मिळालं तर याला हाकलून द्या, त्याला हाकलून द्या अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे घेतात असाही आरोप सुरेश नवले यांनी केला आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आम्ही असंच उद्धव ठाकरेंचं दुसरं रूप पाहिलं आहे असंही सुरेश नवले यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT