Russia-Ukrain war : तुम्ही तर रशियाला हिरवा कंदिलच दाखवलात; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘नाटो’वर भडकले
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून नऊ दिवस लोटले आहेत. दहाव्या दिवशीही रशियन लष्कराकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता कमी झालेली नाही. सत्तांतरांसाठी रशियाकडून युक्रेनच्या राजधानीसह इतर काही शहरांवर हल्ले होत आहेत. त्यातच आता नाटोनं घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की नाराज झाले आहेत. त्यांनी एका व्हिडीओतून नाटोच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला. शुक्रवारी झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. […]
ADVERTISEMENT
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून नऊ दिवस लोटले आहेत. दहाव्या दिवशीही रशियन लष्कराकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता कमी झालेली नाही. सत्तांतरांसाठी रशियाकडून युक्रेनच्या राजधानीसह इतर काही शहरांवर हल्ले होत आहेत. त्यातच आता नाटोनं घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की नाराज झाले आहेत. त्यांनी एका व्हिडीओतून नाटोच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
शुक्रवारी झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये झेलेन्स्की यांनी नाटोच्या निर्णयावर भूमिका मांडली आहे. “रशिया हल्ला करेल आणि त्यामध्ये लोकांचे जीव जातील हे माहिती असूनही नाटोने जाणूनबूजून युक्रेनच्या हवाई हद्दीतील विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. नाटोने युक्रेनच्या शहरं आणि गावांवर तीव्र हल्ल्यांसाठी हिरवा कंदील दाखल आहे”, अशी टीका राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की यांनी केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचे नेमके कारण काय? | Russian Ukraine War Reason Explained
हे वाचलं का?
रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले केले जात असताना नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन जाहीर करण्यास नकार दिला आहे. त्यावरूनच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की नाटोवर भडकले आहेत.
रशियाकडून सुरू असलेले हवाई हल्ले रोखण्यासाठी युक्रेनने नाटोकडे नो फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र शुक्रवारी नाटोने युक्रेनची मागणी फेटाळली. नाटोचे प्रमुख झेन्स स्टोलटेनबर्ग म्हणाले, “नाटो युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करणार नाही. कारण त्यामुळे युरोपात रशियासोबत अण्वस्त्रांसह मोठ्या युद्धाचा भडका होईल. ज्यात इतर अनेक देशही येतील आणि खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल.”
ADVERTISEMENT
Russia – Ukraine वादामुळे भारतातील Stock Market वर अजून किती परिणाम होणार?
ADVERTISEMENT
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अॅटनी ब्लिंकन यांनीही नाटोच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. ब्लिंकन यांनीही नो फ्लाय झोनची मागणी फेटाळून लावली आहे. या मुद्द्यासंदर्भात बोलताना ब्लिंकन म्हणाले, “नो फ्लाय झोनचा अर्थ म्हणजे नाटो विमानांना युक्रेनच्या हवाई हद्दीतील रशियाच्या विमानांवर हल्ले करण्यासाठी पाठवावं लागेल. यामुळे युरोपात एका भयंकर युद्धाचा भडका उडू शकतो.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT