पुणे : चुलत काकाचा अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ
पुण्यातील उरळी कांचन येथे चुलत काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीवर चार महिन्यांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगी १३ आठवड्याची गर्भवती राहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. पीडित तरुणी ही उसतोड कामगार आहे, पोलिसांनी आरोपी काकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळी कांचन येथील कॅनलच्या कडेला उसतोड कामगारांची घरं आहेत. पीडित […]
ADVERTISEMENT
पुण्यातील उरळी कांचन येथे चुलत काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीवर चार महिन्यांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगी १३ आठवड्याची गर्भवती राहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. पीडित तरुणी ही उसतोड कामगार आहे, पोलिसांनी आरोपी काकावर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळी कांचन येथील कॅनलच्या कडेला उसतोड कामगारांची घरं आहेत. पीडित तरुणी कुटुंबियांसोबत राहत असताना, ऑक्टोबर २०२१ मध्ये तिच्या आरोपी काकाने तिला घराबाहेर बोलवून धमकी देत लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने याबद्दलची माहिती आपल्या घरच्यांना दिली नाही.
सावत्र बापाचा आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अपहरण झाल्याची खोटी तक्रारही दाखल
हे वाचलं का?
तीन महिन्यांनी पीडित मुलीला त्रास जाणवायला लागल्यानंतर तिला उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी ती १३ आठवड्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी काकाचा शोध घेत आहेत. आरोपी हा मुळचा जालना जिल्ह्याचा रहिवासी असून तो उसतोड कामगार असल्यामुळे त्याचा शोध घेणं पोलिसांना आव्हानात्मक होऊन बसलं आहे.
धक्कादायक ! पतीला डांबून गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपीची धिंड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT