मला मारण्याची छोटा राजनला सुपारी दिली, उद्धव ठाकरे तुला मी पुरून उरेन -नारायण राणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शाहांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांवरच टीका केली. ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.

ADVERTISEMENT

नारायण राणे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबद्दल म्हणाले…

“शिमग्याला शिव्या द्यायचं काम होतं. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या मेळाव्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी शिव्या शाप देण्यासाठी सभा बोलावली होती का असा प्रश्न पडतो. वैचारिक, बौद्धिक पातळी त्यांच्या बोलण्यात नव्हती. बाळासाहेब विचारांचं सोनं द्यायचे, पण उद्धव ठाकरेंनी शिव्या देण्याचं काम केलं”, असं नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरेंच्या मेळाव्यातून विचारांची मेजवानी मिळायची. त्यातून आमची जडण घडण झाली. आजपर्यंत जिथे पोहोचलोय ते बाळासाहेबांच्या विचारामुळे पोहोचलो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात आले. मराठी माणसासाठी काय काम केलं ते सांगा. दसरा मेळाव्यात सांगायला हवं होतं. एकही काम नाही”, अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हे वाचलं का?

“सभेला विरळ विरळ माणसं बसवली होती. उद्धव ठाकरे बोलायला लागले तेव्हा लोक बाहेर निघायला लागली होती. बाळासाहेबांवेळी लोक सभा संपेपर्यंत बसून राहायची. काय पात्रता आहे तुमची. काही विचारलं तर माहिती नाही म्हणतात. मग मुख्यमंत्री कशाला झालात?”, असा सवाल राणेंनी ठाकरेंना केला.

“यावेळचा शिवाजी पार्कचा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा होता. काय वक्ते होते. बाळासाहेबांच्या मेळाव्यावेळी आम्ही चेंबूरवरून यायचो. तेव्हाचे काय वक्ते होते. आताच्या वक्त्यांची नावं घेणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना किती खाली आलीये हे दिसत. वक्त्यांमध्ये काय वैचारिकता?”, असा सवालही राणेंनी केला.

ADVERTISEMENT

“या मेळाव्यात पोकळ वल्गना आणि शिव्याशापाशिवाय काहीही नाही. आमच्या नेत्यांवर टीका केली. मी मागेच सांगितलं होतं. तोंड बंद नाही केलं आणि उद्या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला उद्धव ठाकरे जबाबदार राहतील. आम्ही आमच्या नेत्यांबद्दल बोललेलं ऐकून घेणार नाही”, असं राणे म्हणाले.

ADVERTISEMENT

तुला वाकायलाही डॉक्टर लागतो; राणे ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

“अमित शाह या राज्यातून त्या राज्यात फिरतात म्हणाले. तुम्ही ३७० कलम जम्मू कश्मीरमधून हटवलं का? देशातली कायदा आणि सुव्यवस्था कोण सांभाळतय, कोण लोकांना सरंक्षण देतंय. थोडी तरी मर्यादा राखली पाहिजे. स्वतः चालू शकत नाही. आणि दुसऱ्यावर टीका. हा माणूस २० मिनिटं चालू शकत नाही. मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाहीये वाकायची म्हणाले, म्हणजे वाकायला पण डॉक्टर लागतो मग तू काय काम आणि कार्य करणार?”, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“परव्याच्या मेळाव्यात जी टीका केलीये, ती केलेल्या उपकाराची परतफेड आहे का? २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. मोदींच्या नावावर निवडून आले आणि मोदींवर टीका करता”, असं राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.

“आम्हाला हिंदुत्व शिकवता आणि हे कसे पाकिस्तानला पंतप्रधानांचा केक कापायला गेले, असं म्हणाले. देशाचे संबंध असतात. जावं लागतं. तुला कळायचं नाही. तुला मुख्यमंत्री पद कळलं नाही. या माणसानं हिंदुत्वाबद्दल तोंड उघडू नये. या माणसाचं बेगडी हिंदुत्व आहे”, असं म्हणत राणेंनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला.

“२०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत आले का, नाही. का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरे हा लबाड लांडगा आहे. खोटं बोलतो. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यातली भाषणं तुम्ही ऐकली असतील. मनोहर जोशीच्या घरावर सदा सरवणकरला हल्ला करायला सांगितलं होतं, असं राहुल शेवाळेंनी सांगितलं होतं”, असंही राणे यावेळी म्हणाले.

“तुझ्या सुपाऱ्या पण काही काम करू शकल्या नाही. शकीलला दिली. छोटा राजनला दिली. सुभाषसिंगला दिली. नारायण राणेला मारा. काय झालं. मारलं का कुणी. कुणी आहे का जिवंत आज. उद्धव ठाकरे मी तुला पुरून उरेन. तुला नाही आव जाव बोलणार”, असं राणे म्हणाले.

“काय बोलले एकनाथ शिंदेंवर. ही शिवसेना कुणी वाढवली, कुणी टिकवली, तर शिवसैनिकांनी. त्या शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे आहेत. ते चाळीस आमदार आहेत. त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. कुटुंब दूर ठेवलं आणि पक्षाला वाहून घेतलं”, असं म्हणत राणेंनी ठाकरेंना भाषणावरून उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT