Pune Crime : दहावीतील विद्यार्थिनीवर माथेफिरु तरुणाचे चाकूने वार, आरोपी फरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर माथेफिरु तरुणाने चाकू हल्ला केला आहे. एकतर्फी प्रेमातूना हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. पुण्याच्या वडगाव शेरी भागात ही घटना घडली असून जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात या विद्यार्थिनीच्या पोटाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून या हल्ल्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये. हल्ला केल्यानंतर हा माथेफिरु घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत.

या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून दिवलाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली असून त्यांनी पुणे पोलिसांना पुन्हा एकदा आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे.

हे वाचलं का?

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा केल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करुन पैसे उकळणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आता वडगाव शेरी प्रकरणातील आरोपीला पोलीस कधी पकडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुणे: शिवसेना उप-नेत्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप; पीडित तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT