Pune Unlock: पुणेकरांसाठी मोठी बातमी, उद्यापासून अनलॉक; पाहा पुण्यात काय सुरु-काय बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: कोरोना संसर्ग कमी होत असल्याने प्रशासनाने मुंबई आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. पण दुसरीकडे पुण्यात मात्र निर्बंध कठोरच होते. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाने सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्य सरकारने पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढाव बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यात असणारे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करत असल्याची माहिती दिली. यावेळी दुकानांसह हॉटेलं सुरु ठेवण्याची वेळ देखील वाढवून देण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पुण्यात आता मॉल देखील सुरु करण्यात येणार आहे. पण मॉलमध्ये ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवेश दिला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आज (8 ऑगस्ट) घेतलेल्या निर्णयाने खूप मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

हे वाचलं का?

पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच दुकानांसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुण्यातील दुकानांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसंच हॉटेल व्यावसायिकांनाही दिलासा देण्यात आला आहे.

Maharashtra Corona: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

ADVERTISEMENT

पाहा पुण्यात नेमकं काय सुरु आणि काय बंद राहणार:

ADVERTISEMENT

  • पुण्यातील सर्व दुकाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • तर पुण्यातील हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

  • पुण्यातील वीकेंड लॉकडाउनही रद्द करण्यात आला आहे.

  • दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टीनुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील.

  • दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी  पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुण्यात पुन्हा कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

  • ग्रामीण भागात मात्र चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT