Unlock Maharashtra : महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथील, वाचा नवी नियमावली

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे या पार्श्वभूमीवर आधी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे नियम लागू असतील. तर बाकीच्या तीन जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करायचे की नाही याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. हे 14 जिल्हे वगळता इतर […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे या पार्श्वभूमीवर आधी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे नियम लागू असतील. तर बाकीच्या तीन जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करायचे की नाही याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. हे 14 जिल्हे वगळता इतर 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत घेतला आहे. नवे नियम मंगळवारपासून लागू होणार आहेत.

ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील.

22 जिल्ह्यांमध्ये काय आहे ब्रेक द चेनची नवी नियमावली?

हे वाचलं का?