Unlock News : नवी मुंबईचा दुसऱ्या स्तरात समावेश, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी मध्यरात्री राज्यात अनलॉकच्या नियमावलीची घोषणा केली. रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारावर सोमवारपासून राज्यात अनलॉक होणार आहे. यासाठी राज्य सरकारने दोन निकषांच्या आधारावर ५ स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन लॉकडाउन लावायचं की निर्बंध शिथील करायचे याचा निर्णय स्थानिक जिल्हा आणि पालिका प्रशासनाला घ्यायचा आहे.

ADVERTISEMENT

Unlock च्या निर्णयाबाबात गोंधळ का उडाला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

राज्य शासनाच्या घोषणेनंतर नवी मुंबई महापालिकेनेही अनलॉकची घोषणा केली असून नवी मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरात केला जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून नवीन मुंबईत निर्बंध शिथील केले जाणार आहेत.

हे वाचलं का?

मुंबईत नव्या गाईडलाईन्स, सोमवारपासून काय होणार Unlock जाणून घ्या

सोमवारपासून नवी मुंबईत या गोष्टींना परवानगी –

ADVERTISEMENT

१) अत्यावश्यक सेवा व वस्तूंची सर्व दुकानं नियमीत वेळेत सुरु राहतील.

ADVERTISEMENT

२) अत्यावश्यक गटात न बसणारी दुकानंही नियमीत वेळेत सुरु राहतील.

३) मॉल, सिनेमा थिएटर, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रिन, नाट्यगृह एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने नियमीत वेळेत सुरु राहतील.

४) शहरातील सर्व रेस्टॉरंट त्यांच्या एकूण आसनक्षमतेपेक्षा ५० टक्के क्षमतेने नियमीत वेळेत सुरु राहतील.

५) उपनगरीय रेल्वे लोकल सेवा फक्त वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार आहे.

६) सार्वजनिक ठिकाणं, मोकळी मैदानं, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

७) सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयं १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील

८) इनडोअर क्रीडा प्रकार सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील. आऊटडोअर खेळांसाठी पूर्ण दिवस परवानगी आहे.

९) चित्रीकरणाची कामं नियमीत सुरु राहतील.

१०) सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

११) विवाह समारंभाला फक्त ५० लोकांना परवानगी असेल.

१२) बांधकामाची कामं नियमीत वेळेत सुरु असतील.

१३) शेती विषयक कामं नियमीत सुरु राहतील.

१४) अंत्यविधीसाठीही ५० जणांना परवानगी असेल.

१५) ई-कॉमर्स, साहित्य आणि सेवा पुरवठा नियमीत वेळेत सुरु राहतील.

१६) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जमावबंदी लागू राहिल.

१७) जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा यांच्यासाठी अपॉईंटमेंट घेऊन ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

१८) सार्वजनिक बस वाहतूक आसनक्षमतेप्रमाणे सुरु राहतील. बसमध्ये उभं राहून प्रवासाला परवानगी मिळणार नाही.

१९) माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ३ व्य़क्तींना परवानगी असेल.

२०) आंतर जिल्हा प्रवासासाठी खासगी कार, टॅक्सी, बससेवेने प्रवास करता येईल. परंतू पाचव्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये प्रवास करायचा असेल तर ई-पासची गरज लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT