Yogi Adityanath : ४९ हजारांची कुंडलं ते बंदूक-रायफल; योगी आदित्यनाथांकडे किती आहे संपत्ती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

योगी आदित्यनाथ यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ते सध्या १.५४ कोटी रुपयांचे मालक आहेत. त्याचबरोबर आपल्यावर एकही गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल नसल्याचंही योगींनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, एमआयएम, शिवसेना यांच्यासह अनेक पक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता कुणाला कौल देणार हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती दिली. योगींनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण १ कोटी ५४ लाख ९४ हजार ५४ रुपये इतकी संपत्ती आहे. यापैकी १ लाख रुपये रोख आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये योगींनी विधान परिषद निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे ९५.९८ लाख संपत्ती असल्याचं सांगितलं होतं. ५ वर्षांच्या काळात योगींच्या संपत्तीत ६० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

ADVERTISEMENT

योगींच्या संपत्तीचं विवरण…

ADVERTISEMENT

-मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्ली, लखनऊ आणि गोरखपूरसह सहा ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या बँकामध्ये ११ खाती आहे. या खात्यांमध्ये १ कोटी १३ लाख ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे.

-योगींकडे जमीन अथवा घर नाही. त्यांच्याकडे नॅशनल सेव्हिंग स्कीम आणि विमा पॉलिसी अशी मिळून ३७.५७ कोटी रुपये आहेत.

-योगी आदित्यनाथांकडे १२ हजार रुपये किंमतीचा फोन आहे. मागील निवडणुकीत योगींनी त्यांच्याकडे दोन कार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी मात्र कारबद्दल कोणताही उल्लेख नाही.

-योगी आदित्यनाथ यांच्याकडे १ लाख रुपयांची बंदूक तसेच ८० हजार रुपयांची रायफल आहे.

पाच वेळा खासदार… पहिलीच विधानसभा निवडणूक…

योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय आयुष्यातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. ५ जून १९७२ रोजी जन्मलेल्या योगी आदित्यनाथांनी २६व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती.

१९९८मध्ये योगींनी पहिल्यांदा गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकूनही आले होते. त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा पाच वेळा योगी आदित्यनाथ खासदार राहिलेले आहेत.

२०१७मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि विधान परिषदेच्या माध्यमातून ते उत्तर प्रदेश विधि मंडळात दाखल झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT