महाराष्ट्रात 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण पूर्ण होण्यास लागणार 112 दिवस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात लसीकरणाच्या मोहिमेने जोर पकडला असून कोव्हीड 19 च्या लसीचा पहिला डोस आत्तापर्यंत 9.5 कोटी नागरिकांना मिळाला आहे आणि दुसरा डोस 1.34 कोटी नागरिकांना देण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार भारतातल्या एकूण 10.85 कोटी लोकांचे लसीकरण पार पडले आहे.

ADVERTISEMENT

पण महाराष्ट्रासारख्य़ा राज्यात जेथे कोरोनाचा प्रादूर्भाव देशात सर्वात जास्त आहे त्या राज्यात वयवर्ष 45 च्या वर असलेल्या नागरिकांपैकी केवळ 77.3 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला कोरोनाच्या सर्वाधिक केसेस आणि सर्वाधिक मृत्यू आहेतच पण त्यासोबतच जगातला सर्वोच्च टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा महाराष्ट्रातच आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सरासरी 2.75 ते 3 लाख नागरिकांचे लसीकरण रोज होत आहे. राज्यातल्या वयवर्ष 45च्या पुढील एकूण 3.86 कोटी नागरिकांपैकी 45 ते 60 या वयोगटातील 33.8 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर 60 च्या पुढील 77.3 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.हा आकडा एकूण नागरिकांच्या फक्त 19.9 टक्के आहे.

उरलेल्या 80 टक्के लोकांचे लसीकरण करायचे असल्यास तर महाराष्ट्राला अजून किमान 102 ते 112 दिवस (साडेतीन ते चार महिने) लागतील.

ADVERTISEMENT

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 25 ते 45 या वयोगटातील सुमारे 3.43 कोटी नागरिक आहेत. त्यांचे लसीकरण अजूनही सुरु झालेले नाही. जेव्हा त्यांचे लसीकरण सुरु होईल तेव्हा त्यांनादेखील 4 महिन्यांचा कालावधी लसीकरण पुर्ण करण्यास लागेल.

ADVERTISEMENT

हे लसीकरण जर अधिक जलद गतीने पुर्ण करायचे असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. दिवसात 6 ते 7 लाख लोकांचे लसीकर करणे गरजेचे आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यापासून देशातल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 33 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. ताज्या आक़डेवारीनुसार देशात एकूण 1.61 लाख कोरोनाबाधीत आढळले त्यातले महाराष्ट्रात 51,751, उत्तर प्रदेशमध्ये 13,604 तर छत्तीसगडमध्ये 13,576 रुग्ण आहेत.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेटसुध्दा अत्यंत कमी आहे. सध्या रिकव्हरी रेट हा 81.94 टक्के आहे तर मृत्यू दर हा 1.68 टक्के आहे.

महाराष्ट्रात आत्ता 32,75,224 लोकं होम क्वारंटाईंन आहेत तर 29,399 लोकं हे कोव्हीड सेंटर्स आणि रुग्णालयात क्वारंटाईंन आहेत. 6 एप्रिलपासून सरासरी रोज 50000 केसेसची नोंद रोज होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT