लसीचा साठा पुरवा या मागणीसाठी आता केंद्राशी किती भांडायचं? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा सवाल
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा राज्याकडे नाही तर दुसरीकडे लसीच्या दररोज येणाऱ्या साठ्यावर राज्याला लसीकरण मोहीम राबवावी लागत असल्याची खंत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई तकशी बोलताना व्यक्त केली. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम पूर्ण ठप्प आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात […]
ADVERTISEMENT
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा राज्याकडे नाही तर दुसरीकडे लसीच्या दररोज येणाऱ्या साठ्यावर राज्याला लसीकरण मोहीम राबवावी लागत असल्याची खंत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई तकशी बोलताना व्यक्त केली. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम पूर्ण ठप्प आहे.
ADVERTISEMENT
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लसीचा पुरेसा साठा नसल्याची माहिती दिली. “राज्याची रोजची कोरोना लसीकरणाची क्षमता 8 लाख आहे. मात्र, सध्या राज्यातल्या वेगवेगळ्या लसीकरण केंद्रामध्ये मिळून अवघा 2 लाख लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली. तसंच दररोज येणाऱ्या साठ्यावर राज्यातील लसीकरण अवलंबून असतं अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या साठ्याबाबातही खंत व्यक्त केली. सध्या दररोज 1800 टन एवढा ऑक्सिजन लागतो. मात्र राज्यात सुमारे 1550 ते 1600 टन एवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी राज्याचा उपलब्ध होणारा साठा हा 1250 टन एवढा असल्याची माहीत टोपे यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी “ सध्या उपलब्ध असलेला ऑक्सिजन घासूनपुसून वापरतो आहोत. आता हा प्रश्न उरलाय केंद्राशी किती भांडायचं?” अशी खंतही आरोग्य मंत्र्यांनी मुंबई तकशी बोलताना व्यक्त केली.
हे वाचलं का?
रुग्णालयांना लसीचा पुरवठा न झाल्यामुळे मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम ठप्प असल्याची परिस्थिती आहे. तर सरकारी रुग्णालयांमध्ये साठा असेपर्यंत लसीकरण करण्यावर भर देण्यात येतोय. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूल येथे असलेल्या लसीकरण केंद्रात “शनिवार लसीकरणापुरतीचा साठा उपलबद्ध आहे. रविवारचा साठा आल्यावरच रविवारी किती जणांच व्हॅक्सिनेशन होऊ शकेल याबाबत माहिती देता येईल” असं या लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले. या लसीकरण केंद्राची क्षमता दररोज सुमारे 4500 हजार व्यक्तींच लसीकरण होईल एवढी आहे. शुक्रवारी 6000 व्यक्तींचं लसीकरण झाल्याचं डॉ. ढेरे यांनी सांगितलं. तर महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचे (सायन रुग्णालय) अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी त्यांनी लसीकरण सुरु ठेवलं. मात्र रविवारी त्यांनी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी आलेल्या व्हॅक्सिनच्या साठ्यानंतरच त्यांना लसीकरण सुरू करता येणार आहे. “दररोज सकाळी 10 ते 11 च्या सुमारास येणाऱ्या लसीच्या साठ्यानंतरच लसीकरण करू शकू का हे ठरेल,” अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली. तर मुंबईतल्या नानावटी या खासगी रुग्णालयात व्हॅक्सिनेशन बंद आहे. पालिकेने सुचना दिल्यानंतरच हे व्हॅक्सिनेशन बंद ठेवण्यात आलं आहे. तसंच रुग्णालयाकडे लसीचा साठा नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील लसीकरण घटल्याचंही रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं. शुक्रवारी एक दिवसांत नानावटी रुग्णालयात 200 व्यक्तींचं लसीकरण झालं. याव्यतिरिक्त मुंबईतल्या सैफी रुग्णालयातही शनिवारी लसीकरण बंद होतं.
आठवड्याभरापूर्वी मुंबई महापालिकेने लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे 10 ते 12 एप्रिल असे तीन दिवस लसीकरण बंद ठेवलं होतं. तेव्हादेखील लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT