Valentine Week ला आजपासून सुरुवात; कोण-कोणते डे साजरे होतात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Valentine Week List 2023 : व्हॅलेंनटाइन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो (Valentine Day Celebrate 14 Febuary). या दिवशी प्रेमळ जोडपे त्यांचे प्रेम साजरे करतात. व्हॅलेंटाइन डेच्या आधीही असे अनेक खास दिवस आहेत जे लोक साजरे करतात. त्याला व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) असे नाव देण्यात आले आहे. व्हॅलेंटाईन वीकला लव्ह वीक (Love Week) असेही म्हणतात. प्रेमात पडलेल्या लोकांना हा आठवडा खास पद्धतीने साजरा करायला आवडतो. व्हॅलेंटाईन वीक आज 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. See which date is which day

ADVERTISEMENT

या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. येथे आपण संपूर्ण आठवड्याबद्दल जाणून घेऊया.

रोझ डे (Rose Day 2023) रोझ डे हा व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला लाल गुलाब देऊ शकता. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणूनच तुम्हाला ज्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना या दिवशी गुलाब द्यायला विसरू नका.

हे वाचलं का?

प्रपोज डे (Prapose Day 2023) रोज डे नंतरचा दिवस प्रपोज डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रियकर आणि मैत्रीण एकमेकांसमोर आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवसाची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते ज्याला कोणालातरी प्रपोज करायचे असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.

चॉकलेट डे (Chocolet Day 2023) हा व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. या दिवशी जोडीदाराला आपल्या आवडीचे चॉकलेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी, प्रेमळ जोडपे एकमेकांना विशिष्ट प्रकारे चॉकलेट देऊ शकतात. चॉकलेट डे वर, तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा खास मित्राला चॉकलेट्स, चॉकलेटचे गुच्छे, चॉकलेट बास्केट भेट देऊन त्यांच्यासाठी हा दिवस खास बनवू शकता.

ADVERTISEMENT

टेडी डे (Teddy Day 2023) टेडी डे व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. महिलांना टेडी खूप आवडतात. या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा जोडीदाराला गोंडस टेडी देऊन हा दिवस खास बनवू शकता.

ADVERTISEMENT

बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल; विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘ही’ चार नावं स्पर्धेत

प्रॉमिस डे (Promise Day 2023) व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल, विवाहित जोडपे प्रेम करण्याचे आणि आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. या दिवशी एक खास वचन देऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी हा दिवस अविस्मरणीय बनवू शकता.

हग डे (Hug Day 2023) व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त केले जाते. या दिवशी तुमच्या जोडीदाराला मिठी मारून सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.

Jitendra Awhad : मुघलांचा इतिहास दाखवणार नाही, म्हणजे ते आलेच नव्हते म्हणणार का?

किस डे (Kiss Day 2023) किस डे हा व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, आपण या दिवशी त्याच्या हाताचे आणि कपाळाचे चुंबन घेऊ शकता आणि सांगू शकता की ते आपले जीवन आहेत.

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस हा व्हॅलेंटाईन डे आहे जो 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या जोडीदारासाठी व्हॅलेंटाइन डे स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो. व्हॅलेंटाईन डे वर, लोक त्यांच्या जोडीदाराला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहण्याचे वचन देतात. या दिवशी प्रेमळ जोडप्यांनी जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवला पाहिजे आणि ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची एकमेकांना जाणीव करून द्यावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT