बाप्पासोबत चुकून सोन्याच्या मुकुटाचंही केलं विसर्जन, १२ तासांनी कुटुंबाचा जीव पडला भांड्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कोरोनामुळे नियमांच्या चौकटीत साजरा केला जात आहे. परंतू घरगुती गणेशोत्सावत मात्र भाविकांचा जल्लोष कायम आहे. वसईत एका कुटुंबाने आपल्या घरगुती गणपती बाप्पाचं दीड दिवसांनी विसर्जन केलं. परंतू विघ्नहर्त्याने त्यांचं विघ्न दूर करण्याऐवजी त्यांच्या चिंतेत भरच घातली.

ADVERTISEMENT

वसईतल्या पाटील कुटुंबाच्या घरातील बाप्पाचं शनिवारी विसर्जन झालं. परंतू गणपतीची मूर्ती विसर्जीत करताना पाटील कुटुंबाने मूर्तीसोबत सोन्याच्या मुकुटाचंही विसर्जन केलं.

ही बाब ज्यावेळी पाटील कुटुंबाच्या लक्षात आली त्यावेळी ते चांगलेच चिंतेत पडले. परंतू विघ्नहर्ता गणपती आपल्या भक्तांना संकटात आणि चिंतेत कसा बरं सोडून जाईल…म्हणूनच की काय १२ तासांच्या शोधानंतरही हा मुकुट त्यांना सापडला आणि अखेरीस त्यांचा जीव भांड्यात पडला.

हे वाचलं का?

गणेशोत्सव २०२१ : रामायणातील युद्धाची पार्श्वभूमी असलेला नागपूरचा आदासा गणपती

पाटील कुटुंबाच्या घरात नेहमी ५ दिवस बाप्पा विराजमान होतो. परंतू घरात सूतक आल्यामुळे त्यांनी दीड दिवसांतच बाप्पाचं विसर्जन करायचं ठरवलं. विसर्जनावेळी ते गणपतीच्या डोक्यावरील सोन्याचा मुकूट काढायला विसरले. साडे पाच तोळ्याच्या मुकूटासह त्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. या मुकूटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये होती. जवळपास 12 तास या मुकूटाचा शोध घेतल्यानंतर अखेर बाप्पाचा मुकूट सापडला.

ADVERTISEMENT

Ganeshotsav 2021: दोन्ही सुनांना दिला गौरीचा मान, वाशिममधल्या सासुबाईंची होतेय सर्वत्र चर्चा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT