राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष – प्रवीण दरेकरांची सरकारविरुद्ध चौफेर टोलेबाजी
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रामोशी समाजाला पुढील काळात लोकप्रतिनिधी देणार असल्याचे सांगत दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध चौफेर टोलेबाजी केली. रामोशी समाजाच्या निमित्ताने आता भाजपच्या […]
ADVERTISEMENT
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रामोशी समाजाला पुढील काळात लोकप्रतिनिधी देणार असल्याचे सांगत दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध चौफेर टोलेबाजी केली.
ADVERTISEMENT
रामोशी समाजाच्या निमित्ताने आता भाजपच्या एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ असेल आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उगारली जाईल. राज्यात जिथे जिथे महिला अत्याचार होईल तिथे तिथे हातात कु-हाड घेणार अस दरेकर यांनी सरकारला टोमणा मारला.
हसन मुश्रीफांमागे लागणार ईडीचा ससेमिरा?; किरीट सोमय्यांनी केला खळबळजनक आरोप
हे वाचलं का?
राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष –
शिरुर मधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी केली. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाहीय. सुभेदार,कारखानदार,बँका,आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा आरोप केलाय.
ADVERTISEMENT
महिला अत्याचारावर सरकारला सुनावलं –
ADVERTISEMENT
राज्यात महिलांवर अत्याचार,बलात्कार,विनयभंग होतात अन पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार,बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला हे नालायक सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असल्याचं दरेकर म्हणाले. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर सरकारचा अंकुश नाही. अत्याचाराच्या घटना थांबवणं हा सरकारचा प्राधान्यक्रम दिसत नाही यांना फक्त सत्ता टिकवायची आहे असं दरेकर म्हणाले.
बैलगाडा शर्यतीला भाजपचा पाठींबा –
राज्यात सात वर्षापासुन बैलगाडा शर्यती बंद आहे पुढील काळात बैलगाड्यांचे घाट भरतील आणि शर्यतीच्या मागे भाजपा ताकदीने उभी राहिल असा विश्वास प्रविण दरेकरांनी यावेळी दिलाय.
ममता बॅनर्जी-मायावतींना जे जमलं ते पवारांना जमलं नाही – Nitin Raut यांचा पलटवार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT