विरार : हळदीच्या कार्यक्रमात फ्री-स्टाईल हाणामारी, मद्यधुंद अवस्थेत ३-४ गट आपापसात भिडले
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सकवार गावात हळदीच्या कार्यक्रमात शेकडो गावकरी मद्यधुंद अवस्थेत आपापसात भिडले आहेत. कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाही सकवार गावातील तांबडी कुटुंबियांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या लग्नसोहळा आणि इतर समारंभासाठी सरकारने फक्त २५ ते ५० जणांची मर्यादा घालून दिली आहे. परंतू या सर्व नियमांचं या कार्यक्रमस्थळी जराही पालन होताना दिसलं नाही. या […]
ADVERTISEMENT
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सकवार गावात हळदीच्या कार्यक्रमात शेकडो गावकरी मद्यधुंद अवस्थेत आपापसात भिडले आहेत. कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाही सकवार गावातील तांबडी कुटुंबियांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
सध्या लग्नसोहळा आणि इतर समारंभासाठी सरकारने फक्त २५ ते ५० जणांची मर्यादा घालून दिली आहे. परंतू या सर्व नियमांचं या कार्यक्रमस्थळी जराही पालन होताना दिसलं नाही. या हळदीच्या कार्यक्रमाला तब्बल अडीचशे गावकरी जमा झाले होते. यावेळी काही तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली.
नंतर या हाणामारीचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या गावकऱ्यांमध्ये ३-४ गट मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी भिडले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित एकाही गावकऱ्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसला नाही. मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असून विरार पोलीस याविरोधात कारवाई करत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT