उल्हासनगर : २४ तासांत दुसऱ्या तरुणाची हत्या, आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात गेल्या २४ तासांत दोन तरुणांची हत्या झाल्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. कॅम्प नंबर ४ मध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आलंय. किरकोळ वादातून एका मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याचं समोर येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प नंबर ४ भागातील सोनगियाची वाडी भागात मध्यरात्री ज्ञानेश्वर सोनावणे आणि त्याचा मित्र […]
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात गेल्या २४ तासांत दोन तरुणांची हत्या झाल्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. कॅम्प नंबर ४ मध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आलंय. किरकोळ वादातून एका मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याचं समोर येतंय.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प नंबर ४ भागातील सोनगियाची वाडी भागात मध्यरात्री ज्ञानेश्वर सोनावणे आणि त्याचा मित्र सुरेश शिंदे हे दारु पीत बसले होते. यावेळी दोघांमध्ये मोबाईल आणि इअरफोनवरुन वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की सुरेश शिंदेने ज्ञानेश्वरची चाकुने भोसकून हत्या केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीसांचा तपास सुरु आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT