Waseem Rizvi : वसिम रिझवींनी स्वीकारला हिंदू धर्म, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर हिंदू पद्धतीप्रमाणे माझे अंत्यसंस्कार केले जावेत हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आपलं नावही आता बदललं आहे.

ADVERTISEMENT

इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर आता वसिम रिझवी यांनी त्यांचं नावही बदलण्यात आलं आहे. जितेंद्र नारायण सि सिंह त्यागी असं आता त्यांचं नाव असणार आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.

काय म्हणाले रिझवी?

हे वाचलं का?

‘धर्म परिवर्तन हा इथे मु्द्दा नाही. मला इस्लामने धर्मातून बेदखल केलं, आता कोणता धर्म स्वीकारायचा हा निर्णय सर्वस्वी माझा आहे.हिंदू धर्म हा जगातला पहिला धर्म आहे. त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. या धर्माइतक्या चांगल्या गोष्टी कुठल्याही धर्मात नाहीत. इस्लामला आम्ही धर्म समजत नाही. जुम्मा नमाजच्या दिवशी शीर कापण्याचे फतवे काढले जातात. अशा परिस्थितीत आम्हाला कुणी मुस्लिम म्हणाल तर त्याची आम्हाला लाज वाटते.’

सोमवारी गाजियाबादमध्ये यति नरसिंहानंद यांनी वसिम रिझवींना हिंदू धर्मात प्रवेश दिला. यानंतर जितेंद्र नारायण त्यामी म्हणजेच वसिम हे मंदिरात आले होते. त्यांनी कपाळाला त्रिपुंड लावलं होतं आणि भगवं वस्त्र परिधान करून देवाची पूजा केली.

ADVERTISEMENT

कोण आहेत वसीम रिझवी?

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये जन्मलेले वसिम रिझवी हे शिया मुस्लिम आहेत. रिझवी सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील रेल्वे कर्मचारी होते. रिझवी सहावीच्या वर्गात शिकत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर रिझवी आणि त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. रिझवी आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण आणि पदवी शिक्षणासाठी नैनिताल येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर ते सौदी अरेबियात एका हॉटेलमध्ये छोटी नोकरी केली. त्यानंतर जपानमधील एका कारखान्यात काम केलं आणि तिथून अमेरिकेला जात एका दुकानात नोकरी मिळवली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT