महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन पुरवठा मोदी सरकारने कमी करू नये-अजित पवार
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. अशात महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन कमी करू नये असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारला आमची नम्र विनंती आहे की महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन कमी करू नये असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. नेमकं काय म्हणाले अजित पवार? महाराष्ट्रात ऑक्सिजनचे जे प्रकल्प बंद […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. अशात महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन कमी करू नये असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारला आमची नम्र विनंती आहे की महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन कमी करू नये असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
महाराष्ट्रात ऑक्सिजनचे जे प्रकल्प बंद झाले आहेत ते आम्ही सुरू करण्याचा प्रय़त्न करतो आहोत. अशात आम्हाला आता असं कळलं आहे की महाराष्ट्राच्या वाट्याला जामनगरहून येणाऱ्या 250 मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा मोदी सरकारने 125 मेट्रिक टन करण्याचं ठरवलं आहे. ते मोदी सरकारने करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्यात येणार आहे असंही कळलं आहे. मात्र आम्ही सरकारला विनंती करतो आहोत की महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन पुरवठा कमी करू नये.
हे वाचलं का?
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
आणखी काय म्हणाले अजित पवार?
ADVERTISEMENT
देशासह आपल्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. इतके दिवस आपल्या राज्याची जी गरज होती ती भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याचीही संमती दिली. रिकामे टँकर विमानातून नेण्यास त्यांनी संमती दिली. भरलेले ऑक्सिजन टँकर रोड, रेल्वे आणि रो-रो सेवेने येतील.
ADVERTISEMENT
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
लसी खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत, पण एक गोष्ट चांगली आहे की लोक बरेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बरेच रूग्ण रूग्णालयात येत आहेत. आम्ही आता काही निर्णय हे दीर्घ काळासाठी घेत आहोत. 18 ते 44 या वयामध्ये लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांवर जबाबदारी टाकली आहे. आम्ही पाच जणांची समिती तयार करत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
रेमडेसिवीरचा पुरवठाही कमी केला
महाराष्ट्राची रेमडेसिवीरची मागणी 36 हजारांची आहे मात्र महाराष्ट्राला आत्ता 25 हजार इंजेक्शनच मिळत आहेत. हा कोटाही कमी करण्यात आला आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT