केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पोलिसांनी कोणते आरोप लावले आहेत?
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सालियन प्रकरणात त्यांनी केलेल्या आरोपांनंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. आता फौजदारी कारवाईचे निर्देशही देण्यात आले. आता गुन्हा दाखल झाल्याने दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. बदनामीचा बलात्कार […]
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सालियन प्रकरणात त्यांनी केलेल्या आरोपांनंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. आता फौजदारी कारवाईचे निर्देशही देण्यात आले. आता गुन्हा दाखल झाल्याने दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना धडा शिकवा!, दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका
कोणती कलमं लावण्यात आली आहेत जाणून घेऊ.
हे वाचलं का?
कलम 500- बदनामी संदर्भातलं कलम आहे. जो कुणी दुसऱ्याची बदनामी करेल त्याला दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास किंवा दंड किंवा गरज भासल्यास दोन्ही शिक्षा दिल्या जातील अशी तरतूद यात आहे.
कलम 509 – कोणत्याही स्त्रीच्या विनशीलतेचा अपमान करणं. त्या इराद्याने तसे शब्द वापरणं, कोणताही आवाज, हावभाव करणं किंवा एखादी वस्तू दाखवून त्या स्त्रीचा अपमान करणं. स्त्रीचा अपमान होईल या हेतूने तसे शब्द वापरणं. महिलेच्या प्रायव्हसीचा भंग यासाठीचं हे कलम आहे. यामध्येही कठोर शिक्षेची तरतूद आहे.
ADVERTISEMENT
कलम 67- अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठवल्यासंदर्भातली हे कलम आहे. जी कुणी व्यक्ती सर्व संबंध आणि परिस्थिती विचारात घेऊन अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रसिद्ध करतील किंवा प्रसिद्ध होईल अशी व्यवस्था करतील अशा व्यक्तीला त्या अपराधासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद या कलमात आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनयिम 2000 अन्वये या कलमात सुधारणा करण्यात आली आहे. तसंच यासाठी पाच लाख रूपये दंडाची तरतूदही आहे. जास्त गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर दंडाची रक्कम १० लाख आणि शिक्षा दहा वर्षांपर्यंत होईल असंही यामध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
या प्रमुख तीन कलमान्वय नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियन प्रकरणात त्यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
महिला आयोगाने काय म्हटलं आहे? दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणं, तिची प्रतिष्ठा मलिन करणं, तिची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी करणं त्याचबरोबर दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधानं करून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, या कृत्याबाबत नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT