गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना राजकीय क्षेत्र, कला, संगीत क्षेत्रासह देशभरातल्या असंख्य चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईतल्या शिवाजी पार्क या मैदानावर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या मृत्यूला दोन दिवस झाले आहेत. अशात आता वाद सुरू झाला आहे तो त्यांच्या स्मारकाचा. आपण जाणून घेणार आहोत की तो वाद नेमका काय आहे?

ADVERTISEMENT

भाजप आमदार राम कदम यांनी केली मागणी

हे वाचलं का?

लतादीदींच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सोमवारी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. लता मंगेशकर यांचं स्मारक शिवाजी पार्क या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी त्यांच्या पत्रात केली आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं स्मृती स्थळ आता या ठिकाणी उभारण्यात यावं अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. लतादीदींच्या कोट्यवधी चाहत्यांचीही ही इच्छा आहे असंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचं म्हणणं काय?

ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी म्हणजेच 7 तारखेला मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनीही हीच मागणी केली आहे की लता मंगेशकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक शिवाजी पार्क या मैदानावर उभारलं जावं. लोकांनी या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांना लतादीदींचा गोड आवाज स्मरणात राहिल असं ते स्मारक असावं असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेनेचं म्हणणं काय?

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत उत्तर दिलं आहे. लतादीदी या कायमच आपल्या स्मरणात राहतील. काहींनी त्यांच्या स्मारकाची मागणी केली आहे. मात्र या मागणीची काहीही आवश्यकता नाही. लतादीदींच्याबाबतीत कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ते म्हणाले की गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मारक उभारणं इतकं सोपं नाही. त्या इतक्या महान होत्या की देशालाही त्यांचा विचार करावा लागेल. देशाने याबाबत विचार करावा.

BLOG : ‘….पुन्हा लता मंगेशकर होणे नाही’

मनसेने काय म्हटलं आहे?

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क मैदानावर स्मारक उभं करण्यास विरोध दर्शवला आहे. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे. त्या ठिकाणी लतादीदींचं स्मारक नको. ‘शिवाजी पार्क मैदान हे दादरवासीयांना खेळण्यासाठी असलेलं मैदान आहे. अनेकदा संघर्ष करून ते अतिक्रमणापासून वाचवलेलं आहे. तुमच्या राजकारणासाठी याचा बळी देऊ नका ही विनंती’ असं म्हणत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी स्मारकाला विरोध दर्शवला आहे.

‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

काय म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या स्मारकाला विरोध दर्शवला आहे. भाजपला त्यांनी चांगलंच फटकारलं आहे. लता मंगेशकर यांचं स्मारक शिवाजी पार्क मैदानावर उभारलं जावं या भाजपच्या मागणीला माझा तीव्र विरोध आहे. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे. ज्यावर मुलांना खेळता येतं. शाळा, कॉलेजेस यांच्याही मॅचेस तिथे होतात. शिवाजी पार्क मैदानाची स्मशानभूमी करू नका. त्याच्या शेजारी दुसरी मोठी स्मशानभूमी आहे. मुलांना खेळण्यासाठी असलेल्या जागेवर स्मारक उभारलं जाऊ नये असंच मला वाटतं. स्मारक उभारायचं असेल तर इतर अनेक जागा आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं त्यामुळे संपूर्ण देश हळहळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आदरांजली वाहिली. शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले आहेत. अशात आता त्यांच्या स्मारकाचा वाद सुरू झाला आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत काहीही भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस आणि भाजपने शिवाजी पार्क मैदानावरच स्मारक झालं पाहिजे अशी मागणी केली आहे. या मागणीला मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला विरोध दर्शवला आहे. तर शिवसेनेने काहीशी सावध भूमिका घेतली आहे. येत्या काळात या प्रश्नी आणखी काही मागण्या झाल्या आणि संघर्ष झाला तर आश्चर्य वाटायला नको.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT