स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी दीपाली चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय लिहलं होतं?, पाहा ‘ते’ पत्र
मेळघाट: अमरावतीमधील मेळघाट हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्याने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येआधी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाइड नोट देखील लिहली होती. जी आता समोर आली आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी आरोप केला आहे की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार […]
ADVERTISEMENT
मेळघाट: अमरावतीमधील मेळघाट हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्याने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येआधी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाइड नोट देखील लिहली होती. जी आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी आरोप केला आहे की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार हे तिला सातत्याने त्रास देत होते, तिचा अपमान करत होते. पाहा दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये काय-काय आरोप केले आहेत. (deepali chavan suicide note)
Deepali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या
हे वाचलं का?
दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
‘धूळघाट गॅरेजमधून माझी बदली हरिसालला झाली होती तेव्हा मी खूप खूश होती. कारण माझ्यावर चौकशी सुरू असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. पण आमच्यातीलच काही कर्मचाऱ्यांनी माझे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांचे कान भरायला सुरुवात केली व साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता मला वारंवार निलंबित करण्याची व चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले.’
ADVERTISEMENT
‘माझ्याकडे गावांचे पुनर्वसन सुरू आहे. साहेबांनी कधी स्वतःहून गावात येऊन सभा घेतली नाही कधी क्षेत्रीय दौऱ्यासाठी गावात भेट दिली नाही. त्यांनी मला लोकांसमोर शिव्या दिल्या व पुनर्वसनमध्ये काय त्रास होत आहे याबाबत त्यांनी कधीच माझी बाजू ऐकून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडले ते फक्त आणि फक्त मला कमी दाखवण्याचे कारण शोधत राहायचे.’
ADVERTISEMENT
’17 मार्च 2020 रोजी मांगी येथील अतिक्रमणाबाबत त्यांनी मला फोन करून तू आत्ताच जाऊन अतिक्रमण काढ. आरोपीला ताब्यात घे, अतिक्रमण हटवताना तेथील स्थानिकांनी मला शिवीगाळ करून आम्हाला कोंडून ठेवले होते. याबाबत फोन करून व वायरलेसद्वारे सूचना देऊनसुद्धा ‘आरएफओ तुम झूट बोल रही हो नाटक कर रहे हो.’ असे ते म्हणाले. गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार आहेत अशी मी त्यांना कळवले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘मैं खुदही बोल के तुम्हारे उपर अॅट्रोसिटी लगाता हूं, चार महीने जेल मे रखे तो कैसे लगता है वो देखता हूं.’ असं शिवकुमार मोबाइलवरुन मला बोलले. याचं माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे. ही रेकॉर्डिंग मी अमरावतीच्या खासदार नवनीत मॅडम यांनादेखील ऐकवली आहे.’
सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पतीचा खळबजनक आरोप
प्रेग्नंसीमध्ये मला त्यांनी चालायला लावले त्यामुळे माझा ऑपरेशन झालं त्याचीसुद्धा सुट्टी मला त्यांनी दिली नाही. मला गावकऱ्यांसमोर शिवीगाळ करणे अनेक वेळा त्यांनी रात्री-अपरात्री मला संकुलासमोर बोलवून अश्लील नजरेने पाहणे व माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्या मर्जीप्रमाणे वागले नसल्याने मला ते शिक्षा देत होते. एवढे लिहूनही रेड्डी सर तुम्ही त्यांचा काहीच बिघडू शकणार नाही कारण त्यांच्यावर तुमचाच वरदहस्त आहे. शेवटी माझ्या संपूर्ण आत्महत्येला विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हे आहेत.
‘ॲट्रॉसिटीमध्ये बेल न झाल्याने मी सुट्टीवर राहिले व तुम्हाला सगळ्यांना माहीत होते वेळोवेळी कोर्टाच्या निकालाबद्दल मी तुम्हाला देखील कळविले होते. पण सरांनी मला रुजू करून घेण्यास नकार दिला. तसेच माझी रजा कालावधी मधील सुट्टी ना करण्याची शिफारस केली. असे पत्र आपल्या वरिष्ठांना त्यांनी लिहिले.’ असे गंभीर आरोप दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT