मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? ते कसं डाऊनलोड करायचं?
आधार कार्ड हा शब्द कुणासाठीही नवीन राहिलेला नाही. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अशीच स्थिती आजघडीला झाली आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या २१व्या शतकात आधार कार्ड हीच प्रत्येकाच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा बनला आहे. असं असलं, तरी आता आधार कार्ड नंबर व आधार कार्डची प्रत देताना काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचं आधारकार्ड कुठल्या बँकमध्ये, संस्थेमध्ये किंवा जिथे मागितलं […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आधार कार्ड हा शब्द कुणासाठीही नवीन राहिलेला नाही. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अशीच स्थिती आजघडीला झाली आहे.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या २१व्या शतकात आधार कार्ड हीच प्रत्येकाच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा बनला आहे. असं असलं, तरी आता आधार कार्ड नंबर व आधार कार्डची प्रत देताना काळजी घ्यावी लागणार आहे.
हे वाचलं का?
तुमचं आधारकार्ड कुठल्या बँकमध्ये, संस्थेमध्ये किंवा जिथे मागितलं जातं तिथे देत असताना काळजी घ्या. कारण त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो, असं आता केंद्र सरकारनेच म्हटलंय.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानानं विभागातंर्गत येणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार विशिष्ट ओळख प्राधिकरणानेच ही भीती व्यक्त केलीये.
ADVERTISEMENT
हा तोच 12 अंकी क्रमांक आहे, ज्याला आपण आधार क्रमांक म्हणतो वा जी आपली बायोमेट्रिक ओळख आहे. आता त्याचाच गैरवापर होऊ शकतो असे केंद्राकडून सांगण्यात आलंय.
ADVERTISEMENT
आधार क्रमाकांचा गैरवापर होऊ शकतो, असं केंद्रानेच सांगितलंय, मग आता काय करावं, असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल? तर आधार कार्डची माहिती देताना वा त्याची प्रत देताना काळजी घ्या.
यासाठी कुणालाही आधार कार्ड शेअर करु नका. सायबर कॅफेवरून डाउनलोड करणं टाळा. जर केलाच, तर तिथून ते डिलीट करायला विसरू नका.
त्याचबरोबर आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये. विशेषतः युआयडीएआयने आधार वापराचा परवानगी न दिलेल्या संस्थांना आधार देऊ नका.
आधार कार्ड द्यायचं नाही, असं सरकार म्हणतंय पण मग ज्याठिकाणी आधार सक्तीचं आहे. त्यांना काय सांगायचं? तर यावरही सरकारने पर्याय सुचवला आहे.
ज्या ठिकाणी आधारची गरज आहे, तिथे मास्क्ड आधार (Masked Aadhaar) द्या, असं सरकारने सांगितलं आहे.
आता तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे हे मास्क्ड आधार कार्ड कसं डाऊनलोड करायचं? त्यासाठी तुम्ही आधी https://uidai.gov.in/या बेबसाईटवर जा.
तिथे तुम्हाला log in करावं लागेल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा कोड (CAPTCHA) टाकून ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आधारशी सलग्नित तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो OTP टाकून सबमिट करा.
लॉगिन केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवर जाल. त्यानंतर डाऊनलोड आधारवर क्लिक करा.
तिथे Do you want a masked Aadhaar? म्हणजेच तुम्हाला मास्क्ड आधार हवंय का? यावर क्लिक करा.
तिथे क्लिक केल्यावर त्याचा रंग बदलेल.
त्यानंतर डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं मास्क्ड आधार डाऊनलोड होईल.
PDF डाऊन लोड झाल्यानंतर ते ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड मागितला जाईल. त्यासाठी तुमच्या आधार कार्डवर असलेल्या नावातील पहिली 4 अक्षरे तीही कॅपिटलमध्ये आणि तुमच्या जन्माचं वर्ष. असा पासवर्ड टाका.
समजा तुमचं नाव आकाश आहे आणि तुमचं जन्माचं वय १९५८ आहे. तर AKAS1958 हा आठ अंकी पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे.
पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं मास्क आधारकार्ड तुम्हाला दिसेल. याच मास्क्ड आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला इथून पुढे द्यायची आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT