काय आहे ‘सेफ हेवन’, नीरव मोदी, मल्ल्या आणि चोक्सीसारखे आरोपी का राहतात सुरक्षित?

मुंबई तक

भारतातील 13500 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथून भारतात आणण्याचे सध्या सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सीबीआय-ईडीसारख्या बर्‍याच एजन्सीच्या टीम या डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहेत. पण अशा आरोपींना दुसऱ्या देशातून भारतात आणणं हे वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असतो. भारतासोबत असं पहिल्यांदाच घडतंय असं नाही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतातील 13500 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथून भारतात आणण्याचे सध्या सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सीबीआय-ईडीसारख्या बर्‍याच एजन्सीच्या टीम या डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहेत. पण अशा आरोपींना दुसऱ्या देशातून भारतात आणणं हे वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असतो.

भारतासोबत असं पहिल्यांदाच घडतंय असं नाही तर मेहुल चोक्सीच्या आधी विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी यासारखे आणखी बरेच आरोपी आहेत ज्यांनी देशात मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून आता सध्या ते दुसर्‍या देशात आश्रय घेऊन आरामदायी जीवन जगत आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी सरकार अनेकदा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. पण त्या-त्या देशातील न्यायव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सीमा आणि कायदे यामुळे बऱ्याच अडचणी येत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात घोटाळे करुन इतर देशात फरार होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

जानेवारी 2018 मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाला पण त्याच्या काही दिवस आधीच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही फरार झाले होते. या गोष्टीला आता साधारण तीन वर्ष उलटली आहे. नीरव मोदी ब्रिटनमध्ये निघून गेला. दरम्यान, 2019 मध्ये अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तिकडच्याच तुरुंगात आहे. त्याला देखील भारतात आणण्याचे प्रयत्न हे सातत्याने सुरु आहेत. मात्र अद्यापही भारताला त्यात यश आलेलं नाही.

गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक ट्रीपवर गेला होता मेहुल चोक्सी, Dominica मध्ये झाली अटक – अँटीग्वा पंतप्रधानांची माहिती

हे वाचलं का?

    follow whatsapp