उद्धव ठाकरेंची सत्तेसाठीची लाचारी काय? देवेंद्र फडणवीस यांनी थेटच सांगितलं, म्हणाले….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण ऐकलं. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी काय होतं? काहीच नाही. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेपासून वेगळे झालो असलो तरीही अभिनाने अभिवादन करतो. बाळासाहेब ठाकरेंना आम्ही आदरणीय मानतो. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला वंदन सोडा त्यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा सोनिया गांधी करत नाहीत. तरीही मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे सत्तेत आहेत. यापेक्षा मोठी लाचारी काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे रडीचा डाव सध्या खेळत आहेत असंच दिसून येतं आहे. आम्हाला ईडी, सीबीआयबाबत सांगत आहेत. मात्र आम्ही त्यांच्या सौभाग्यवतींना राबडीदेवी म्हटलं आता ही काही शिवी नाही तरीही पुण्यात एका कार्यकर्त्याच्या घरी पंचवीस पोलीस आले होते हे उदाहरणही फडणवीस यांनी दिलं.

‘भाजपचं हिंदुत्व गाढवाने पांघरलेल्या वाघाच्या कातड्यासारखं’-उद्धव ठाकरे

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

भाजपवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी खरमरीत शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. 25 वर्षे युतीत सडली असं उद्धव ठाकरे यांनी कालही म्हटलं होतं. त्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की 2010 पर्यंत बाळासाहेब ठाकरे हे युतीमधले प्रमुख नेते होते. मग भाजपसोबत जी 25 वर्षे सडली ती बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे सडली का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काल बोलले त्यात त्यांना फक्त सिलेक्टिव मेमरी आहे तेच दिसतं आहे. ज्या हिंदुत्वाच्या गप्पा उद्धव ठाकरे मारतात. त्यांना मला विचारायचं आहे तुम्ही तेव्हा कुठे होतात? अजून तुम्ही कल्याणमधल्या दुर्गाडी आणि मलंगगडाचे प्रश्न सोडवू शकला नाहीत. हिंदुत्व याला म्हणतात का? औरंगाबादला संभाजी नगर करणार आहात त्याची किती पोकळ आश्वासनं आत्तापर्यंत देऊन झाली? उस्मानाबादचं धाराशिव करणार होतात त्याचं काय झालं? योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचं प्रयागराज करून दाखवलं तुम्ही फक्त भाषणं करत राहिलात हे विसरू नका असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT