कोरोना लस घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रासह देशभरात १ एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना तर ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस दिली जात होती. परंतू चौथ्या टप्प्यात सरकारहे हे बंधन हटवलं असून ४५ वर्षांच्या वरील सर्व व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न करतेय.

ADVERTISEMENT

अशावेळी अनेकांच्या मनात लस घेताना आणि घेतल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल अनेक प्रश्न असतात. यासंदर्भात ‘मुंबई तक’ ने इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी लस घेताना आणि घेतल्यानंतर लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल महत्वाची माहिती दिली.

लसीकरणाला जाण्यापूर्वी ही खबरदारी नक्की घ्या –

हे वाचलं का?

१) तुमची लस घेण्याची अपॉईंटमेंट ही सकाळी असो किंवा दुपारची…लस घ्यायला जात असताना काहीतरी खाऊन जा, उपाशीपोटी जाऊ नका.

२) लसीकरण घ्यायच्या आधी साधारण ३ दिवस तुम्ही कोणती औषध घेत असाल तर ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने थांबवा. रक्त पातळ अॅस्प्रिनसारखी गोळी घेणंही थांबवा.

ADVERTISEMENT

३) लस घ्यायच्या ३ दिवस आधी मद्यपान करणं टाळा

ADVERTISEMENT

४) उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लस घ्यायला जाताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. कधीकधी आपला नंबर यायला वेळ जातो…यासाठी सोबत खाऊचा डबा किंवा स्नॅक्स सोबत ठेवा. लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास होतो, काहींना चक्कर येते, गरगरायला लागतं अशावेळी तुमच्याकडे या गोष्टी असणं गरजेचं आहे.

लस घेतल्यानंतर सुमारे अर्धातास तुम्हाला त्या केंद्रावर थांबायला सांगतात. त्या लसीचा तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम तर होत नाही ना हे पाण्यासाठी अशा प्रकारे काळजी घेतली जाते. त्यामुळे तुम्हाला जर काही त्रास जाणवत असेल तर तुमच्यावर उपचार केले जाऊ शकतात. लस घेतल्यानंतर लाखांमध्ये काही व्यक्तींना त्याचा त्रास होतो, परंतू यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. प्रत्येक लसीकरण केंद्रात तुमची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाईल अशी माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली.

लस घेतल्यानंतरही काळजी घ्या –

१) लस घेतल्यानंतर तुमची नेहमीची दिनचर्या कायम ठेवा. काही जणांना लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताप येऊ शकतो, उलटी येऊ शकते. परंतू या गोष्टी नॉर्मल आहेत. अशावेळी तुम्ही नेहमीप्रमाणे तुमची तापावरची औषध घेतलीत तरी तुम्ही ३ दिवसांत बरे होऊ शकता. यासाठीच लस घेतल्यानंतर पुढचे ३ दिवस शक्यतो बाहेर पडणं टाळा.

२) पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही रोगमुक्त झालात असं अजिबात नाही. तुमच्या शरिरात अँटीबॉडीज तयार व्हायला किमान १४ दिवस जावे लागतात. यानंतर साधारण २८ दिवसानंतर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढून ५० टक्क्यापर्यंत येते. लस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. पण या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत तर थोड्या दिवसांनी तुमच्यातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल.

२५ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

यावेळी बोलत असताना डॉ. भोंडवे यांनी कोरोनाची बाधा झालेल्या किंवा सर्दी-खोकला-ताप आलेल्या व्यक्तीनेही लस घेणं टाळावं असं आवाहन केलं आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर तुमचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर काही दिवसांचा कालावधी गेल्यानंतर लस घ्यावी असं आवाहन डॉ. भोंडवे यांनी केलंय.

सोलापुरातील रक्तपेढ्या व्हेंटिलेटरवर, आठ दिवस पुरेस इतकाच रक्तसाठा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT