कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास काय करावे?
मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आलाय. दुसरीकडे कोरोना लसीकरण रेंगाळलं आहे. त्यातच महाराष्ट्र सरकार तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची देखील तयारी करत आहे. या सगळ्यात कोरोना लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस (Second dose) चुकला तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच सगळ्या प्रश्नाची उत्तरं डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse) यांनी ‘मुंबई […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आलाय. दुसरीकडे कोरोना लसीकरण रेंगाळलं आहे. त्यातच महाराष्ट्र सरकार तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची देखील तयारी करत आहे. या सगळ्यात कोरोना लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस (Second dose) चुकला तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच सगळ्या प्रश्नाची उत्तरं डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse) यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली आहेत. पाहा याविषयी डॉ. रवी गोडसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर काय होईल? आपल्याला पुन्हा नव्याने लस घ्यावी लागेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पाहा याचबाबत डॉ. रवी गोडसे यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे.
‘पुन्हा लसीचा पहिला डोस घेण्याची गरज नाही. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस जेवढा लांबणीवर पडतोय तेवढा त्याचा फायदा होतोय असं दिसून आलं आहे. काही-काही वयोगटामध्ये. कोव्हिशिल्डचे दोन डोस तुम्ही चार आठवड्याने घेतले तर प्रभाव 55.1 आहे. आणि 8 ते 12 आठवड्याने घेतले तर 81.3 आहे. त्यामुळे जेवढा दुसरा डोस लांबणीवर पडतोय तेवढा त्याचा प्रभाव देखील वाढतो आहे काही-काही वयोगटामध्ये. त्यामुळे जर तुम्ही कोव्हिशिल्डचा एक डोस घेतला असेल तर आणि त्याच्यानंतर तुम्ही तीन महिन्यापर्यंत थांबला तरी चालेल.’
हे वाचलं का?
रशियाची Sputnik V ही लस मे महिन्यात भारतात मिळू शकणार
‘कारण तुम्हाला जे संरक्षण 21 दिवसांनी मिळतं ते 90 दिवस टिकतं. आता जर तुम्ही लोकांना सांगितलं की, डोसेस नाहीत म्हणून तुम्ही तुमचा डोस लांबणीवर टाका तर लोकं वैतागणार. हेच त्यांना आधी सांगितलं की, जेवढा तुमचा डोस लांबणीवर पडेल तेवढा त्याचा प्रभाव क्षमता अधिक टिकून राहील.’
ADVERTISEMENT
‘कोव्हॅक्सिनचा डोस हा चार आठवड्याने घेतला पाहिजे. इंग्लंडने कसं केलं सगळ्याच व्हॅक्सिनमधील फरक तीन महिने केला. ते खरं तर चुकीचं होतं फायझरकरता. पण आता आपल्याला दुसरा काही पर्यायही नाही. त्यामुळे पुन्हा पहिल्यापासून व्हॅक्सिन घेण्याची गरज नाही. त्यामुळे पाच आठवडे व्हॅक्सिन पुढे गेलं तरी त्याने काही फार फरक पडणार नाही. कोव्हॅक्सिनबाबत एवढं माहिती नाही. पण कोव्हिशिल्ड तुमचं तीन महिन्यापर्यंत पुढे गेलं तरी फार काही चिंता करु नका. काही घाबरु नका.’ अशी माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनावरील लस घेतल्यानंतर देखील इतरांना कोरोनाबाधित करु शकता का?
भारतात ज्या दोन लसी आहेत कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड किंवा अमेरिकेत ज्या तीन आहेत त्याच्यापैकी कोणतीही लस ही लाइव्ह व्हायरस वॅक्सिन नाही. लाइव्ह व्हायरस वॅक्सिन असेल तर तुम्ही घेतलेली लस ही तुम्ही इतरांमध्ये पसरवू शकता. जसं आजार पसरतो तसं तुम्ही लस पसरवू शकता. पण याच्यापैकी कोणतीही लस ही लाइव्ह नाहीए. मेलेल्या आहेत किंवा एमआरएनए पार्टिकल्स आहेत. त्यामुळे तुम्ही इतरांना कोरोनाबाधित करण्याआधी सर्वात पहिले तुम्हाला कोरोना झालेला असला पाहिजे. तरच तुम्ही इतरांना बाधित करु शकता.
लसीमुळे तुमचं संरक्षण होत असेल तर… याचं जर उत्तर होय असेल तर साथीचा रोग संपला… नाही असेल तर थोडा प्रॉब्लेम आहे. माझं उत्तर आहे होय आणि नाही.. म्हणजे तुम्ही शेजाऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करतायेत. प्रत्यक्ष मदत कशी करताय की, जसं तुम्ही मास्क घातल्यावर इतरांचं संरक्षण होतं आणि तुमचं थोडं संरक्षण होतं. तसं तुम्ही लस घेतल्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होणार नाही. जेव्हा शास्त्रज्ञांनी लस तयार केली तेव्हा त्याचा हेतू हाच होता की प्रत्येक रुग्णाचं संरक्षण व्हावं. त्याला न्यूमोनिया किंवा गंभीर आजार होऊ नये. तेव्हा हा विचार आला नाही की, एसीम्प्टोमेटिक ट्रान्समिशन थांबावं. पण गंमत म्हणजे कोव्हिशिल्डमध्ये जवळजवळ 70 टक्के एसीम्प्टोमेटिक ट्रान्समिशन देखील थांबतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT