जेव्हा पृथ्वीवरचं Oxygen संपलेलं… ही आहे पृथ्वीवरच्या ऑक्सिजनची कहाणी!
मुंबई: कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान सुरु असताना Oxygen ची कमतरता हा विषय सातत्याने पुढे येत आहे. आज देशातील लाखो रुग्ण हे कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. मात्र, याचवेळी वातावरणातील म्हणजेच पृथ्वीवरील (Earth) ऑक्सिजन नेमकं कधी तयार झालं आणि ही प्रक्रिया काय असते याबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पृथ्वीवरच्या […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान सुरु असताना Oxygen ची कमतरता हा विषय सातत्याने पुढे येत आहे. आज देशातील लाखो रुग्ण हे कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. मात्र, याचवेळी वातावरणातील म्हणजेच पृथ्वीवरील (Earth) ऑक्सिजन नेमकं कधी तयार झालं आणि ही प्रक्रिया काय असते याबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पृथ्वीवरच्या ऑक्सिजनची कहाणी नक्की वाचा.
ADVERTISEMENT
ही कहाणी आहे तब्बल 450 कोटी वर्ष जुनी. जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य होते. पण आजपासून 243 कोटी वर्षांपूर्वी असं काहीतरी घडलं की ज्यामुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढू लागलं.
‘शेजारील राज्यांकडून Oxygen चा पुरवठा केला जावा’, महाराष्ट्रावर का ओढावलीय अशी वेळ?
हे वाचलं का?
ऑक्सिजन तयार होऊ लागल्याने पृथ्वीवरील वातावरण झपाट्याने बदल होऊ लागला होता. बर्याच ठिकाणी थंडी वाढत असताना बर्फ गोठण्यास सुरवात झाली. त्यामुळे मोठे-मोठे हिमनग तयार होऊ लागले. त्यानंतर काही लाख वर्षांत संपूर्ण पृथ्वीवर हिमयुग अवतरलं होतं. त्यावेळी सर्वत्र फक्त बर्फच जमा झालं होतं. शास्त्रज्ञांनी जेव्हा 232 कोटी वर्षापूर्वीच्या दगडांमध्ये असलेल्या रसायनांची तपासणी केली तेव्हा असे आढळले की त्यावेळी पृथ्वीवर ऑक्सिजन होतं.
परंतु आता एक नवीन संशोधन समोर आलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, 232 कोटी वर्षांपूर्वीपासून ते 222 कोटी वर्षांपर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी आणि जास्त होत होते. म्हणजेच त्याचं प्रमाण काही कायम नव्हतं. पण एक वेळ अशी आली जेव्हा पृथ्वी ऑक्सिजनच्या बाबतीत कायमस्वरूपी पातळीवर पोहचली आणि तिथून ऑक्सिजनची पातळी ही स्थिर राहू लागली. हे नवीन संशोधन ‘नेचर’ या प्रसिद्ध विज्ञान मासिकात प्रकाशित झाले आहे.
ADVERTISEMENT
Corona मृत्यूचं तांडव! अहमदनगरमध्ये 29 मृतदेहांवर एकाचवेळी सरण रचून अंत्यसंस्कार
ADVERTISEMENT
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या भूगर्भ शास्त्रज्ञ अँड्री बेकर यांनी सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जटील होती. एवढच नव्हे तर बदलत्या काळाची गणना करणे देखील फार कठीण आहे. खरं तर पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती ही समुद्री सायनोबॅक्टेरियामधून (Cyanobacteria) झाली. हे जीवाणू प्रकाश संश्लेषणाद्वारे ऊर्जा तयार करतात. या प्रक्रियेला ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट (Great Oxidation Event)असे म्हणतात. म्हणजेच ऑक्सिकरण सुरु होणं असं देखील म्हणतात. प्रकाश संश्लेषणामध्ये मुख्य जोड उत्पादन हे ऑक्सिजन असतं.
औरंगाबादची आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर, ऑक्सिजन बेड्सची कमतरता
या प्रक्रियेचे पुरावे अद्यापही समुद्राच्या आत असलेल्या गाळाच्या खडकांमध्ये सापडतील. हे असे खडक आहेत जे सेंद्रीय पदार्थ आणि खनिजांचे थर-दर-स्तर मिश्रण बनलेले आहेत. जेव्हा एखाद्या वातावरणात ऑक्सिजन नसतो तेव्हा त्या काळातील दगडांमध्ये सल्फरचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते. पण जेव्हा ऑक्सिजनचे प्रमाण वाढते तेव्हा दगडांमधील सल्फर आणि त्याचे घटक कमी होतात. असं संशोधनात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT