ऋषी सुनक आणि अक्षता यांची लव्हस्टोरी; जावयाला पहिल्यांदा भेटल्यावर नारायण मूर्तींची काय होती रिॲक्शन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी पेनी मॉर्डेंटने माघार घेतल्यानंतर सुनक यांना पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे घोषित केले. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांचे पती देखील आहेत. जेव्हापासून ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्याची बातमी आली आहे, तेव्हापासून ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना इंटरनेटवर खूप शोधले जात आहे.

ADVERTISEMENT

सुनक यांचे सासरे काय म्हणाले?

इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि सुनक यांचे सासरे एनआर नारायण मूर्ती यांनीही जावई ऋषी सुनक यांच्या पंतप्रधान झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सुनकचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. सुनक ब्रिटनच्या लोकांसाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करतील असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. अक्षता मूर्ती एका व्यापारी कुटुंबातील आहे. अक्षता या इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची एकुलती एक मुलगी आहे.

अक्षता यांना एक भाऊ देखील आहे, ज्याचं नावं रोहन आहे. रोहन सोरोकोचे संस्थापक आहे. ऋषी सुनक यांना ब्रिटनमध्ये त्यांच्या पत्नीच्या व्यवसाय आणि टॅक्सशी संबंधित वादावरून अनेकदा घेरण्यात आले, परंतु त्यांनी प्रत्येक वेळी पत्नी आणि सासरची बाजू मांडली. चला तर मग जाणून घेऊया अक्षता मूर्तीबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि त्या ऋषींना पहिल्यांदा कशा भेटल्या. अक्षता मूर्ती यांचा जन्म 1980 मध्ये झाला. जन्मानंतर अक्षताचे आई-वडील कामानिमित्त मुंबईत शिफ्ट झाले आणि अक्षताला तिच्या आजी-आजोबांकडे राहायला सोडले.

हे वाचलं का?

ऋषी सुनक आणि अक्षता यांची पहिली भेट अशी झाली

अक्षताची स्टॅनफोर्ड विद्यापीठात ऋषी सुनक यांची भेट झाली. ज्यांना प्रतिष्ठित फुलब्राइट स्कॉलरशिप अंतर्गत येथे प्रवेश मिळाला. चार वर्षांनंतर अक्षता आणि ऋषी यांचे बंगळुरूमध्ये लग्न झाले. भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांनीही अक्षता आणि ऋषीच्या लग्नाला हजेरी लावली होती.

मुलीच्या तोंडून ऋषींची स्तुती ऐकून नारायण मूर्ती यांना दुःख झाले होते

अक्षताच्या वडिलांनी सांगितले की, ‘जेव्हा अक्षताने मला तिच्या नवीन जोडीदाराबद्दल सांगितले तेव्हा मला खूप वाईट वाटले आणि हेवा वाटला. पण जेव्हा मी ऋषीला भेटलो आणि तो हुशार, देखणा आणि सर्वात महत्त्वाचा प्रामाणिक असल्याचं दिसून आलं, तेव्हा मला समजले की अक्षता त्याच्यावर का प्रेम करते.

ADVERTISEMENT

स्टॅनफोर्ड नंतर, अक्षता 2007 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील डच क्लीन टेक्नॉलॉजी इनक्यूबेटर या फंडात मार्केटिंग डायरेक्टर म्हणून सामील झाली, परंतु तिचे स्वतःचे फॅशन लेबल, (अक्षता डिझाइन्स) सुरू करण्यासाठी ते सोडले. 2009 मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अक्षता म्हणाली होती की, “माझ्या आई-वडिलांचे यश पाहून प्रत्येकजण विचारतो की मीसुद्धा माझ्या आयुष्यात अशी कामगिरी करेन का? पण मला खात्री आहे की एक दिवस हा व्यवसाय वाढेल आणि मी स्वतः काहीतरी करू शकेन. मुलाखतीत अक्षता म्हणाली होती की, ही माझी आवड आहे आणि याशिवाय इतर कशावरही लक्ष देण्याचा मी विचारही करू शकत नाही. मात्र, अक्षताचा हा व्यवसाय ३ वर्षांतच कोलमडला.

ADVERTISEMENT

अक्षता मूर्ती ब्रिटनच्या राणीपेक्षा श्रीमंत!

अक्षताची इन्फोसिसमध्ये 0.91 टक्के हिस्सेदारी आहे. ज्याची किंमत सुमारे $900 दशलक्ष (690 दशलक्ष युरो) आहे. रिपोर्ट्सनुसार ती ब्रिटनच्या राणीपेक्षा जास्त श्रीमंत आहे.

अक्षता आणि सुनक यांची संपत्ती

अक्षता आणि सुनक यांची यूके आणि कॅलिफोर्नियामध्ये किमान 4 घरे आहेत. यासोबतच त्याच्याकडे केन्सिंग्टनमध्ये 5 बेडरूमचे घर आहे ज्याची किंमत सुमारे 7 मिलियन युरो (56 कोटी रुपये) आहे. यासोबतच त्यांच्याकडे सुनकच्या नॉर्थ यॉर्कशायर मतदारसंघात 12 एकरांवर बांधलेली करोडो रुपयांची जॉर्जियन हवेली देखील आहे. याशिवाय ओल्ड ब्रॉम्प्टन रोड, वेस्ट लंडन येथेही त्यांचा फ्लॅट आहे. त्याच्याकडे सांता मोनिका बीचवर एक पेंटहाऊस देखील आहे ज्याची किंमत 5.5 दशलक्ष युरो (44 कोटी रुपये) आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT