Vaccine चे कॉकटेल डोस घेतले पाहिजेत की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 20 लोकांना कोरोनाचा कॉकटेल डोस दिल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे. यामध्ये 20 लोकांना पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा देण्यात आला होता. खरं म्हणजे हा किंवा प्रयोग किंवा संशोधन नव्हतं. उलट ते एका चुकीमुळे झालं. याचा फायदा किंवा तोटा काय आहे हा संशोधनाचा विषय आहे. पण सुदैवाने अद्यापपर्यंत या 20 लोकांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत.

ADVERTISEMENT

म्हणून या लेखात आम्ही वेगवेगळ्या लस दिल्याने नेमका फायदा होतो की तोटा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्ही डॉक्टर, विषाणूशास्त्रज्ञ आणि आयुर्वेदाचार्यांचीही मतं जाणून घेतली आहेत.

रॉयटर्सने आपल्या एका वृत्तात असं म्हटलं आहे की, कॅनडा, चीन, फिनलँड आणि फ्रान्स यासारख्या देशांची उदाहरणे देताना हे स्पष्ट केले आहे की, या देशांमध्ये अशा अभ्यासाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. म्हणूनच कोणताही देशा कुठल्याही अभ्यासाशिवाय लसीच्या कॉकटेलविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करणार नाही.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशमधील घटनेननंतर भारताचे कोव्हिड-19 चे सल्लागार डॉ. व्ही. के. पॉल यांनी कबूल केले की हे मिक्सअप सुरक्षित आहे. त्याच्या मते, ‘खरं तर एखाद्या व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस समान असणं गरजेंच आहे. पण, जर लोकांना वेगवेगळ्या लस मिळत असतील तरी काळजी करण्याची काहीच गरज नाही. आम्ही चाचणी स्वरुपात लसीचं कॉकटेल सुरु करण्याचा विचार करीत आहोत.’

‘एवढ्या’ लोकांना दिला पहिला लस Covishield चा, दुसरा Covaxin चा; भयंकर प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट

ADVERTISEMENT

डॉ. उज्ज्वल राठोड, लस तज्ज्ञ, UCSF याबद्दल असं म्हणातात की, ‘कोरोना टाळण्यासाठी कोणत्याही लसीचे केवळ दोन डोस पुरेसे आहेत. म्हणून तिसरा डोस घेण्याची आवश्यकता नाही. पण अशा प्रकारच्या कॉकटेलवर अद्याप क्लिनिकल चाचणी केली गेली नाही. याबद्दल कोणतेही संशोधन झालेले नाही. म्हणून आपल्या शरीरावर अशा चाचण्या करणे टाळा आणि आपल्या जी काही लस मिळत आहे त्याचेच फक्त दोन डोस घ्या.’

ADVERTISEMENT

एम्स ऋषिकेशचे एमडी मेडिसिन डॉ. गोविंद माधव यांनी या कॉकटेलबाबत तपशीलवार वर्णन केलं आहे.

कोरोनाच्या अनेक प्रतिबंधक लसी आता उपलब्ध आहेत. भारताबद्दल बोलायचे तर आपल्याकडे आत्ता तीन प्रकारच्या लस उपलब्ध आहेत.

1. स्पुटनिक

2. कोव्हिशिल्ड (कोव्हिशिल्डमध्ये एडिनो व्हायरसमध्ये स्पाइक प्रोटीनचे रेणू घालून आपल्या शरीरात प्रवेश करवीतो आणि ती तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती सक्रिय करते).

3) कोव्हॅक्सिन (ज्यामध्ये ‘किल्ड फ़ॉर्म ऑफ़ वायरस’ इंजेक्शन दिले गेले आहे.)

उर्वरित देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लस उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत, ‘जॉन्सन आणि जॉन्सन’ लस आहे, ज्याचे फक्त एक डोस देखील पुरेसे आहेत. रशियामध्ये स्पुटनिक लाइट आहे. त्याचा देखील एक डोस देखील पुरेसा आहे.

डब्ल्यूएचओ किंवा सीडीसी मार्गदर्शक तत्त्वे जी आतापर्यंत समोर आली आहेत, लसीसंदर्भात अनेक चाचण्या घेण्यात आल्या, असे दिसून आले की आपण प्रथम डोस म्हणून घेतलेल्या लसीचे स्वरूप बूस्टर डोससारखेच असले पाहिजे.

परंतु फायदे आणि तोटा याबद्दल आकडेवारी प्राप्त होईपर्यंत काहीही सांगणे कठीण होईल. तथापि, याबाबत युकेमध्ये एक मोठे संशोधन चालू आहे. ज्याचा अंतरिम अहवाल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये सर्व उपलब्ध लसींचा कॉम्बो वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये भरती केलेले सर्व रूग्ण हे सर्व वयाच्या 50 वर्षांवरील होते.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घराजवळ मिळणार लस, सरकारकडून अद्यापही ‘Door to Door’ लसीकरणाची शिफारस नाहीच!

या संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की लसीमध्ये मिसळल्यास दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतात. परंतु तरीही तेथे कोणतेही गंभीर परिणाम दिसून आलेले नाही. आता त्यांचा दीर्घकालीन फायदा किंवा तोटा काय असेल हे आपल्याला जून-जुलैपर्यंतच समजू शकेल.

# निष्कर्ष:

भारतातील दोन प्रमुख लसांपैकी एक ‘डेड कोरोना व्हायरस’ने बनलेली आहे, तर दुसरी ‘वेक्टर लस’ आहे. शेवटी दोन्हीमुळे विषाणूंचे अँटीजेन्स तयार केले जात आहेत. परंतु हे वेगवेगळ्या प्रक्रियांच्या माध्यमातून घडत आहे.

त्यामुळे जेव्हा-जेव्हा शंका असेल तेव्हा तज्ज्ञांचे ऐकले पाहिजे. आणि तज्ज्ञ असा निष्कर्ष काढत आहेत की जेव्हा समान लसीचे दोन डोस पुरेसे आहेत. तर ‘दुसर्‍या लसीचा तिसरा डोस’ किंवा ‘दोन लसीचे दोन वेगवेगळ्या डोस’ चे नुकसान आणि फायदे तपासण्यासाठी आपलं शरीर धोक्यात का टाकायचं? किमान अभ्यास किंवा डेटा यातून त्या गोष्टीची खात्री होईपर्यंत तरी हे टाळले पाहिजे. आतापर्यंत अशा मिश्रणाचे फायदे आणि नुकसान हे दोन्हीही अत्यंत वादविवादास्पद आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT