फरहान अख्तरसोबत लग्न केलेल्या मराठमोळ्या शिबानीबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

फरहान अख्तरसोबत शिबानी दांडेकर आज खंडाळ्यात विवाहबद्ध झाली. ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेलं हे जोडपं अखेर लग्नाच्या बेडीत अडकल आहे. शिबानी आणि फरहानच्या लग्नाची चर्चा सुरू झाल्यानंतर तिच्याबद्दलची चर्चा केली जात आहे.

ADVERTISEMENT

‘ही पोरी साजूक तुपातली, हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद’ रवी जाधव ह्यांच्या टाईमपास सिनेमामधील हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. या गाण्याने लोकांना अक्षरशः वेड लावले होते. लग्नसमारंभ असो की गणपती मिरवणूक असो हे गाणे सर्वत्र वाजवले जायचे. तर या गाण्यातील सुंदर डान्स करणारी देखणी अभिनेत्री होती शिबानी दांडेकर!

हे वाचलं का?

शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 साली महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. मराठी कुटूंबात जन्मलेल्या शिबानीने आपले जास्तीत जास्त बालपण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत घालवले. तिचे शालेय शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते.

शिबानीच्या वडिलांचे नाव आहे शशीधर दांडेकर. तर आईचे नाव आहे सुलभा दांडेकर. बॉलिवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का आणि अपेक्षा दांडेकर या तिच्या बहिणी आहेत.

ADVERTISEMENT

2001 मध्ये आपल्या करियरला दिशा देण्यासाठी शिबानी न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली. तिथे तिने अनेक अमेरिकन टेलिव्हिजन शो चे होस्टींग केले. त्यापैकी 3 महत्त्वाचे नॅशनल शो होते नमस्ते अमेरिका, V देशी आणि एशियन व्हरायटी शो. या तीन शोचे होस्टिंग तिने उत्तमरीत्या पार पाडले होते. एशियन व्हरायटी शो अंतर्गतच तिने ‘अॅन इव्हिनिंग विथ शाहरुख खान’ हा शो अटलांटिक सिटीमध्ये होस्ट केला होता.

ADVERTISEMENT

अमेरिकेमधील हे 3 मोठे नॅशनल शो होस्ट केल्यानंतर तिने आणखी मोठमोठ्या कंपन्यांचे इव्हेंट देखील होस्ट केले होते. यामध्ये मॅक्सिम हॉट, हंड्रेड नाईक, रोल्स रॉइस, प्युमा, मर्सिडीज, टोयोटो, हॉर्लिक्स, एचएसबीसी, स्पाइस मोबाईल, जेबीएल, एमटीव्ही कोक स्टुडिओ, निव्हिया इत्यादी मोठमोठ्या कंपनीचे शो तिने होस्ट केले.

तर सोनी लॉन्च अंतर्गत घेण्यात आलेल्या मायकेल जॅक्सनला ट्रिब्यूट देणारा कार्यक्रम ‘धिस इज इट’ हा शो देखील शिबानीने होस्ट केला होता.

त्याचबरोबर तिने झी कॅफेवरील आफ्टर अवर्स, ANX या चॅनेलवरील मेन 2.0, Big CBS Prime वरील लेट्स डिझाइन आणि Big CBS Love वरील इंडियाज ग्लॅम दीवा हे शो देखील होस्ट केले होते.

2011 ते 2015 या काळामध्ये तिने आयपीएलचे देखील अँकरिंग केले होते. 2017 मध्ये शिबानीने खतरो के खिलाडी सिझन 8 मध्ये देखील भाग घेतला होता.

अँकरिंग, होस्टिंग करण्याबरोबरच तिला अभिनयामध्ये आणि गायनामध्ये देखील आवड होती. म्हणून ती आपल्या पुढील करिअरसाठी भारतात आली. भारतामध्ये तिने कलर्स टीव्हीवरील झलक दिखला जा या शोमध्ये तिने भाग घेतला होता.

भारतात आल्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे तिने बरेच अॅक्टिंग ऑडिशन्स देखील दिले होते. त्यानंतर तिला 2014 साली प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमा ‘टाईमपास’ मध्ये एक आयटम सॉंग करण्याची संधी मिळाली होती. या गाण्याच्या सुपरहिट यशानंतर तिला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

2017 साली तिने संघर्ष या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात तिने चमेली हे पात्र निभावले होते. त्यानंतर आलेल्या रॉय, शानदार, सुलतान, नाम शबाना, नूर, भावेश जोशी या सिनेमांमध्ये तिने छोटे आणि महत्त्वाचे रोल करून आपण एक उत्तम होस्ट असण्यासोबतच एक उत्तम अभिनेत्री देखील आहोत हे सिद्ध केले.

2020 साली प्रदर्शित झालेल्या फोर मोर शॉट्स प्लीज या सीरिजमध्ये तिने सुष्मिता सेन गुप्ता हे कॅरेक्टर प्ले केले होते. तर हॉटस्टारवरील हॉस्टेजेस या वेबसिरीजमध्ये देखील तिने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली होती. ईशा अँड्रीव्ह हे व्हाइस प्रेसिडंट ऑफ ऑपरेशन्स जनरल इंटरनॅशनल पात्र तिने निभावले होते.

शिवानीचा ‘That is Mahalaxmi’ हा तेलगू सिनेमाही आला होता. विजयालक्ष्मी हे तिच्या पात्राचे नाव होतं. हा चित्रपट प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘क्वीन’ या चित्रपटाचा तेलुगू रिमेक होता.

‘देखो मगर प्यार से’ फेम अभिनेता केथ सिक्वेल सोबत शिबानी आधी रिलेशनशिपमध्ये होती. काही कारणाने या दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर २०१८ पासून शिबानी फरहान अख्तरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

शिबानी दांडेकरच्या काही कॉन्ट्रॉव्हर्सिही गाजल्या

2018 साली शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले होते. नेटकऱ्यांनी ट्रोल करताना ‘हे जरा जास्तच होतंय’ , ‘मराठी मुलगीला असे वागणे शोभत नाही’ अशा कमेंट तिच्या पोस्टवर केलेल्या होत्या.

शिबानीने या सर्व ट्रोलिंगला कोणतेही उत्तर न देणे पसंत केले होते.

2. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर रिया चक्रवर्तीला सर्व मीडियाने तसेच नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्यावेळी फक्त शिबानी दांडेकर होती तिने रिया चक्रवर्तीचा सपोर्ट केला होता. तिने आपला सपोर्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत केला होता. यानंतर देखील नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.

तरीदेखील शिबानीने रिया चक्रवर्तीला शेवटपर्यंत सार्वजनिकरित्या पाठिंब दर्शवला होता. या दोघी अजूनही चांगल्या मैत्रिणी आहेत. ह्यावर्षी ख्रिसमस देखील त्यांनी एकत्र साजरा केला.

मात्र आता फरहान अख्तरसोबत होणाऱ्या तिच्या लग्नामुळे शिबानी दांडेकर सोशल मीडियापासून सगळीकडे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT