Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

मुंबई तक

Ramesh Bais Maharashtra’s New Governor : राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsinha Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Ramesh Bais Maharashtra’s New Governor : राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsinha Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला. आता त्यांच्या जागेवर झारखंडमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान होणाऱ्या बैस यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, तेच समजून घेऊयात… (Who is the Maharashtra’s New Governor Ramesh Bais?)

भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल राहिले आहेत. महाराष्ट्रात नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडमध्ये कार्यरत होते.

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस?

रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी पूर्वीच्या मध्य प्रदेशतील रायपूर शहरामध्ये झाला, जे सध्या छत्तीसगडमध्ये आहे. बैस यांनी बीएससी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं असून, बराच काळ त्यांनी शेती केली.

बैस हे आधीपासूनच भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेले आहेत. त्यांनी मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. बैस हे भाजपकडून सलग सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बैस हे केंद्रीय पर्यावरण मंत्री होते.

नगरसेवक ते खासदार… रमेश बैस कसे झाले खासदार?

बैस एक अनुभवी राजकारणी असून, त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात महापालिकेपासून झाली. 1978 मध्ये पहिल्यांदा बैस हे नगरसेवक म्हणून रायपूर नगरपालिकेत दाखल झाले. त्यानंतर 1980 मध्ये त्यांनी हसोद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मात्र, 1985 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये रायपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. रमेश बैस हे सात वेळा रायपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले. पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषविण्याबरोबरच एक जायंट किलर म्हणून त्यांनी लौकिक मिळवला.

हे वाचलं का?