कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी झालेलं नाही. गेल्या 3 वर्षांचा आरखडा पाहिला तर शेतकरी आत्महत्या करण्याचं सत्र त्याचप्रमाणात सुरु आहे. 2017 मध्ये 2426 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 2019 मध्ये आत्महत्या करण्याचा आकडा 2680 होता, 2020 मध्ये 2547 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं, तर 2021 मध्ये माहाराष्ट्रातील 2498 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी जास्त होत असली, तरी आत्महत्या करणे हीच सगळ्याक मोठी चिंतेची बाब आहे. यावरच आजचा विषय आहे की एकीकडे सरकारकडून कर्जमाफी होत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात.

ADVERTISEMENT

2021 या वर्षात औरंगाबाद विभागात 804 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. नागपूर विभागात 309 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात मिळून 1153 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर यवतमाळमध्ये 299, बुलढाणा 285, अकोला 138 आणि वाशिममधील 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

नागपुरातल्या शेतकरी शाहाजी राऊत यांनीदेखील गतवर्षी आत्महत्या केली, यांची 10 एकर शेती होती. सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करत नसल्याने सावकराकडून त्रास दिला जात होता, याच त्रासाला कंटाळून राऊत यांनी आत्महत्या केली.

हे वाचलं का?

पिकाची नासाडी होणे, अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्यांमुळे होत असलेलं नुकसान, याचमुळे बँकेचे कर्ज भरता न येणे, सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न होणे हेच या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचं मुख्य कारण आहे. याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे कर्जाची परतफेड न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित केलं आणि अशा शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळणे बंद झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावं लागतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT