महाराष्ट्रात पुन्हा Lockdown का लावावा लागतो आहे? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ICU बेड्सचा तुटवडा भासतो आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुढे काय होणार याबद्दल, कशी असणार कोरोनाशी लढण्याची रणनीती हे सांगितलं आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागतो आहे त्याचं कारण आता आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. काय […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ICU बेड्सचा तुटवडा भासतो आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुढे काय होणार याबद्दल, कशी असणार कोरोनाशी लढण्याची रणनीती हे सांगितलं आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागतो आहे त्याचं कारण आता आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजेच पहिल्या लाटेच्या तुलनेत महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना चांगलाच वाढला आहे. रूग्णसंख्या रोज वाढते आहे. गेल्या महिन्यात त्याच रूग्णसंख्येचा एक भाग मीपण होतो. मात्र आपण उपाय योजना वाढवत आहोत. महाराष्ट्रात चाचण्या आपण वाढवत आहोत. जगभरात ही महामारी आहेच, त्यावेळी आरोग्य व्यवस्थेवर ताण हा येतोच. आपण राज्य म्हणून ज्या काही उपाय योजना योग्य पद्धतीने करायच्या आहेत त्या करतो आहोतच. आपण एकच लक्षात घ्यायला पाहिजे की आपले डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य यंत्रणा या सगळ्यांवर प्रचंड ताण येतो आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं पाऊल उचलावं लागतं आहे असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
हे वाचलं का?
Mumbai Lockdown: मुंबईत कठोर लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद
आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ADVERTISEMENT
एक वर्षभर कोव्हिडची चर्चा झाली..कोव्हिडबाबत औषधं माहिती झाली आहेत. व्हॅक्सिनचीही माहिती झाली आहे. वर्षभर या चर्चा होत आहेत. मग मित्र जमले की मास्क कधी कधी खाली येतो.. असंही वाटतं की वर्षभर आपल्याला कोव्हिड झाला नाही मग आता का होईल? असं वाटणंही अगदी साहजिक आहे. पण इथेच थोडीशी आपली गफलत होते.. सावधगिरी आपण फिट असू तरीही बाळगलीच पाहिजे. जेव्हा आपण कामावर जातो तेव्हा मास्क बाजूला काढतो, चहा प्यायला जातो तेव्हा मास्क बाजूला घेतो तिथे तो निष्काळजीपणा होतो…त्यामुळे राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढली.
ADVERTISEMENT
मागच्या सात दिवसांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या मुंबईत कमी झाली. तर महाराष्ट्रात मात्र वाढते आहे मात्र त्यावर समाधानी राहू नये त्यामुळे आपल्याला ती रूग्णसंख्या आणखी कमी कशी करता येईल त्यावर नियंत्रण कसं आणता येईल यावर सरकार विचार करतं आहे.
लॉकडाऊन हा एकच उपाय आहे का? तर तसं मुळीच नाही.. मात्र कोरोना रूग्णांची संख्या आणि कोरोनाची वाढती साखळी जर मोडायची असेल तर हो लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कोरोनाची पहिली लाट निघून गेल्यावर अनेकांना वाटलं की कोरोना गेला आता कोरोनाची दुसरी लाट येणार नाही पण तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सांगत होते की दुसऱ्या लाटेसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आपण बेसावध रहायला नको ते आपण राहिलो नाही. लॉकडाऊन लावणं हे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आवश्यक पाऊल आहे. आपण बेड्स वाढवू शकतो, जंबो सेंटर्स वाढवत आहोत. मात्र आज घडीला आपण घरी राहणं गरजेचं आहे. लक्षणं नसणारी लोकंही संपर्कात आली तरीही कोरोनाची रूग्णसंख्या वाढते असं समोर आलं आहे.
ऑस्ट्रेलिया असेल न्यूझिलँड असेल सगळीकडे लॉकडाऊन केला गेला. काही देशांनी तर ‘बबल’ केलं आहे स्वतःला त्यामुळे लॉकडाऊन हा चांगला उपाय आहे त्याने कोरोनाची साखळी मोडायला नक्कीच मदत होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT