Mahatma Gandhi यांना तीनदा नामांकन मिळूनही नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?
Mahatma Gandhi And Nobel Award controversy : महात्मा गांधींच्या हत्येला (Mahatma Gandhi Murder) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची आठवण करून नोबेल पारितोषिक समितीने (Nobel Award Commity ) एक ट्विट केले होते की, हत्येच्या काही काळापूर्वी गांधीजींना शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. समितीच्या म्हणण्यानुसार, याआधीही त्यांना तीन वेळा शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण […]
ADVERTISEMENT
Mahatma Gandhi And Nobel Award controversy : महात्मा गांधींच्या हत्येला (Mahatma Gandhi Murder) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची आठवण करून नोबेल पारितोषिक समितीने (Nobel Award Commity ) एक ट्विट केले होते की, हत्येच्या काही काळापूर्वी गांधीजींना शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. समितीच्या म्हणण्यानुसार, याआधीही त्यांना तीन वेळा शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण प्रश्न असा पडतो की मग त्यांना पुरस्कार का मिळाला नाही? अनेक कारणांमुळे नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील सर्वात वादग्रस्त पुरस्कार देखील मानला जातो. (Why Mahatma Gandhi was not given Noble Peace Award)
ADVERTISEMENT
नोबेलच्या वेबसाईटने गांधीजींचा उल्लेख करताना स्वतःला अनेक प्रश्न विचारले आहेत. उदाहरणार्थ, नॉर्वेच्या निवडणूक समितीची व्याप्ती इतकी मर्यादित आहे की ती गैर-युरोपीय लोकांचा स्वातंत्र्यलढाही पाहू शकत नाही. किंवा त्यांना भीती वाटते की शांतता पुरस्कारामुळे त्यांचे ब्रिटनशी असलेले संबंध बिघडू शकतात.
Gandhi was nominated for the Nobel Peace Prize a few days before he was assassinated #OnThisDay in 1948 – putting him on the Nobel Committee's shortlist for the third time.
Read more about the missing laureate: https://t.co/Q3cniIiZG9 pic.twitter.com/Dk7O98qhYV
— The Nobel Prize (@NobelPrize) January 30, 2023
हे वाचलं का?
नोबेल समितीने महात्मा गांधी, द मिसिंग लॉरीएट यांच्या नावाने एक दीर्घ लेख लिहिला आहे, ज्यामध्ये या फरकाची चर्चा करण्यात आली आहे. गांधीजी ज्यांना संपूर्ण जग शांतीदूत म्हणून ओळखते, त्यांना नामांकन असूनही कधीही पुरस्कार मिळू शकला नाही. ज्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत होते, अशा लोकांना या समितीने अनेक वेळा शांतता पारितोषिक दिले आहे किंवा नामांकित केले आहे, हा या समितीचा हेतू अधिकच धूसर आहे. Alt News चे संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांचे नाव होते. हे तेच लोक आहेत ज्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता.
नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझईने केलं लग्न; ट्विटरवर शेअर केले फोटो
ADVERTISEMENT
तीनदा नामांकन पण पुरस्कार नाही
1947 पूर्वी गांधींना 1937, 1938 आणि 1939 साली शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. नॉर्वेजियन संसदेचे सदस्य ओले कोल्बजोर्नसेन यांनी तिन्ही वेळा त्यांची शिफारस केली. पण नोबेल समितीचे सदस्य जेकब वर्म मुलर यांनी महात्मा गांधींना साफ नकार दिला. म्युलरच्या मते, त्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेक स्तर होते, ज्यामुळे ते एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी पात्र ठरले नाही. ते एकाच वेळी ‘आदर्शवादी, राष्ट्रवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि हुकूमशहा’ होते, असं त्याचं मत आहे.
ADVERTISEMENT
म्युलरकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
म्युलर याने गांधीजींच्या दक्षिण आफ्रिका भेटीवर आणि त्या काळातील त्यांच्या संघर्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सल्लागार समितीच्या या सदस्याचा असा विश्वास होता की गांधीजी केवळ आफ्रिकेतील भारतीयांसाठीच लढले आणि त्यांचा कृष्णवर्णीयांशी काहीही संबंध नाही. यानंतर हे प्रकरण संपले. मग अनेक वर्षे नोबेलसाठी त्यांचे नाव कोणी घेतले नाही.
1947 साली गांधींचे नाव फेटाळले
1947 मध्ये पहिल्यांदा अनेक भारतीयांनी मिळून त्यांचे नाव नोबेलसाठी सुचवले. मात्र पुन्हा समिती सदस्यांनी तो फेटाळला. यावेळी त्यांना भारताची फाळणी आणि दंगलीसाठी जबाबदार धरण्यात येत असल्याचे कारण देण्यात आले. त्या वर्षी शांतता पुरस्कार क्वेकर्सला गेला. हा एक धार्मिक गट आहे जो बायबलचा प्रचार करतो आणि अध्यात्मावर भर देतो.
Tushar Gandhi: “वीर सावरकरांनी नथुराम गोडसेला महात्मा गांधींच्या हत्येसाठी बंदूक पुरवण्यास मदत केली”
नोबेल समितीने हात वर केले
महात्मा गांधींच्या मृत्यूनंतरही त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देता आला असता, असा आवाज अनेकदा उठला होता, पण नोबेल समितीनेही हात वर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते काही विशिष्ट परिस्थितीत मरणोत्तर पुरस्कार देत असले तरी गांधीजी त्या श्रेणीत येत नाहीत. ते कोणत्याही संघटनेचे नव्हते किंवा त्यांनी कोणताही वारसा सोडला नाही. अशा स्थितीत बक्षिसाची रक्कम कोणाला देणार? त्यामुळे एकूणच शांतता आणि अहिंसेचे पुजारी समजल्या जाणाऱ्या गांधीजींना शांतता पुरस्कार मिळू शकला नाही.
वाद आणि पुरस्कार
शांतता पुरस्काराबाबत नेहमीच वाद होत असत. असे दिसून आले आहे की हे पुरस्कार जिंकणारे लोक एकतर राजकारणातील आहेत किंवा भांडणात गुंतलेले आहेत. अमेरिकेतील अनेक नेत्यांवर आरोप आहे की त्यांनी शांततेच्या नावाखाली अनेक छोट्या देशांमध्ये रक्त सांडले आणि नंतर शांततेचे बक्षीस घेतले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना हा पुरस्कार देताना समितीने म्हटले होते, ‘आंतरराष्ट्रीय सद्भावना आणि लोकांमध्ये मदतीची भावना वाढवण्याच्या प्रयत्नांसाठी’. ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिले वर्ष होते आणि त्या काळात त्यांनी या श्रेणीत ठेवता येईल असे काहीही केले नव्हते. हा वादाचा भाग आहे. पण 3 नोबेल शांतता विजेते होते ज्यांना तुरुंगवास भोगत असताना हा पुरस्कार मिळाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT