Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला दांडके घेऊन का आल्या?
Lavani Dancer Gautami Patil: पुणे: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध (Famous On Socail Media) लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या (Lavani Dancer Gautami Patil) कार्यक्रमात महिला दंडुके घेऊन पुढे आल्याने चांगलीच चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे लावणी क्वीन गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. […]
ADVERTISEMENT
Lavani Dancer Gautami Patil: पुणे: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध (Famous On Socail Media) लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या (Lavani Dancer Gautami Patil) कार्यक्रमात महिला दंडुके घेऊन पुढे आल्याने चांगलीच चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे लावणी क्वीन गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. women come to Gautami Patil’s program with sticks
ADVERTISEMENT
कोण आहे गौतमी पाटील? कुठे झालंय शिक्षण?
मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली होती. दरम्यान गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडघुस घालणाऱ्यांना चोप दिला. धुडगूस घालणाऱ्यांना महिलांनीच चांगला धडा शिकवल्याने पुन्हा एकदा गौतमीचं कार्यक्रम चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही भागात कार्यक्रमांवर बंदी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हे वाचलं का?
सतत चर्चेत असते गौतमी पाटील
आपल्या वेगळ्या शैलीमुळे या ना त्या कारणामुळे गौतमी पाटील चर्चेत असते. गौतमी पाटीलच्या नृत्याचे अनेक जण चाहते आहेत. तिचा कार्यक्रम आपल्या गावात व्हावा यासाठी तरुण प्रयत्नशील असतात. मात्र ती अश्लिल हावभाव करुन नृत्य करत असल्याचा आरोप देखील अनेकजण करतात. तिच्या कार्यक्रमात अनेकदा तरुण हुल्लडबाजी करताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न देखील उद्भवतो तर काही ठिकाणी कार्यक्रम थांबवण्याची देखील वेळ येते.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू, चेंगराचेंगरी की हुल्लडबाजी… नक्की काय घडलं?
ADVERTISEMENT
दांडक्याने दिला चोप
अशीच काही परिस्थिती पुण्यातील बहिरवाडी गावात निर्माण झाली होती. मात्र गावातील महिलाच दंडूके घेऊन पुढे आल्या आणि कार्यक्रम पार पडला. अधिक माहीती अशी की, बहिरवाडी गावात यात्रा उत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुल्लडबाज तरुणामुळे लावणीचं कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली. त्या दरम्यान गावातील महिलांनी पुढाकार घेत धुडगुस घालणाऱ्यांना दांडक्याने चांगलाच चोप दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT