चंद्रपूर : आधी लाटण्याचे वार करून पत्नीने पतीची केली हत्या, नंतर मृतदेहाजवळ बसून रात्र काढली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पत्नीने पतीची लाटण्याचे वार करून हत्या केली त्यानंतर मृतदेहाजवळ बसून अख्खी रात्र काढली. चंद्रपुरात ही घटना घडली आहे. चंद्रपूरमधल्या इंडस्ट्रियल भागात हे दोघं राहात होते. अलकराम मनिराम राऊत असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. त्याला दारूचं व्यसन होतं. त्यामुळेच त्याचं आणि त्याच्या पत्नीचं रोज भांडण व्हायचं

ADVERTISEMENT

अशाच एका भांडणात अलकराम आणि त्याची पत्नी सुरजाबाई या दोघांचं भांडण होत असे. अलकराम हा व्यसनी होता त्यामुळेच ही भांडणं रोज होत होती. पत्नी सुरजाबाईने लाटण्याने त्याच्यावर प्रहार केला. प्रहार डोक्यावर झाल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हे वाचलं का?

काय घडली घटना?

ADVERTISEMENT

दारू पिऊन पतीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यावर लाटण्याने वार करून हत्या केली. याबाबत कुणालाही न सांगता पत्नीने अख्खी रात्रच मृतदेहाजवळ काढली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर येथील इंडस्ट्रियल एरिया परिसरात घडली. सकाळी मुलगी घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. . त्यानंतर तिने याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना दिली. अलकराम मनीराम राऊत (४५) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी सुरजाबाई ला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

चंद्रपुरातील बंगाली कॅम्पलगतच्या इंडस्ट्रियल एरिया परिसरात अलकराम मनीराम राऊत आपल्या पत्नीसह भाड्याच्या घरात वास्तव्य करीत होते. ते मूळचे छतीसगड राज्यातील रहिवासी असून, चंद्रपुरात रोजगाराच्या शोधात आले होते. मागील काही वर्षांपासून अलकराम हा मिस्त्री म्हणूनकाम करीत होता. अलकरामला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन यायचा. यामुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे. गुरुवारी त्यांची मुलगी चंद्रपुरात राहणाऱ्या आपल्या आजीकडे गेली होती. दुपारच्या सुमारास पती- पत्नीमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की दोघांचीही मारामारी झाली. सुरजाबाईने पती अलकरामला धक्का दिला. त्यानंतर पोळ्या करायच्या बेलण्याने डोक्यावर जोरदार वार केला, त्यात पति रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला , मात्र, तिने कुणालाही याबाबतची माहिती दिली नाही. संपूर्ण रात्र तिने मृतदेहाजवळच बसून काढली. रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे घटनेचा तापस करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT