प्रियकर आणि मित्राच्या मदतीने काढला पतीचा काटा, पत्नी आणि प्रियकराचा मित्र गजाआड
पाच दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील कोतल शिवणी भागात झालेल्या एका हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. पत्नीने आपला प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली असून प्रियकर मात्र फरार झाला आहे. पोलीस या प्रियकराचा शोध घेत आहेत. निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी येथील […]
ADVERTISEMENT
पाच दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील कोतल शिवणी भागात झालेल्या एका हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. पत्नीने आपला प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली असून प्रियकर मात्र फरार झाला आहे. पोलीस या प्रियकराचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी येथील किशोर सुतार यांचं काही वर्षांपूर्वी आरोपी मनिषासोबत लग्न झालं होतं. किशोर आणि मनिषाला तीन मुलं असून किशोरला दारुचं व्यसन असल्यामुळे मनिषा वैतागली होती. त्यातच आपल्या पत्नीचे बाहेार अनैतिक संबंध असल्याचा संशय किशोरच्या मनात होता.
भिवंडी : मटण कापायच्या सुरीने पत्नीवर वार करत हत्या, तळ्यात उडी मारुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
हे वाचलं का?
प्रियकराच्या साथीने पत्नीने रचला कट –
पतीच्या वागण्याला कंटाळलेल्या मनिषाने गावात राहणारा आपला २१ वर्षीय प्रियकर अविनाश गुरनेला पतीचा काटा काढायला सांगितलं. यासाठी लागणारा खर्चही मनिषाने अविनाशला दिला. यानंतर मनिषा आणि अविनाशने किशोरच्या हत्येचा प्लान आखला. परंतू हे काम आपल्याने होणं शक्य नसल्याचं कळताच त्यांनी अविनाशचा मित्र धनाजी वाघमारेची मदत घ्यायचं ठरवलं. अविनाश आणि धनाजीने ठरल्याप्रमाणे किशोरला शुद्ध हरपेपर्यंत दारु पाजली.
ADVERTISEMENT
किशोरची शुद्ध हरपल्यानंतर दोघांनीही त्याला गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात नेलं. यानंतर रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास अविनाश आणि धनाजीने किशोरच्या गळ्यातील मफलरच्या साथीने गळा आवळत त्याचा खून केला. किशोरचा मृतदेह उसाच्या फडात टाकून अविनाश आणि धनाजी पसार झाले.
ADVERTISEMENT
फेसबूकवरील मित्राच्या प्रेमात पडली विवाहीत महिला, लग्नाचं आमिष दाखवून आरोपीने केला बलात्कार
निलंगा पोलिसांना याबद्दल माहिती कळताच त्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत पत्नी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या चौकशीत पोलिसी खाक्यासमोर मनिषाने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणातील मनिषाचा प्रियकर अविनाश फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT