ShareChat च्या MOJ APP ची वर्षपूर्ती!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ShareChat च्या MOJ या APP ला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे शॉर्ट व्हीडिओ App गेल्या वर्षी आजच्याच दिवशी लाँच करण्यात आलं होतं. या शॉर्ट व्हीडिओ App ला वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतातलं सध्या पहिल्या क्रमांकावर असलेलं हे शॉर्ट व्हीडिओ अॅप आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 1 जुलै 2020 ला हे App शेअर चॅटने लाँच केलं होतं. गेल्या वर्षी मोदी सरकारने चायनीज APP वर बंदी घातली. त्यानंतर अवघ्या तीस तासांमध्ये हे APP लाँच करण्यात आलं.

ADVERTISEMENT

मोबाईल युझर्ससाठी शेअरचॅटने हा नवा प्लॅटफॉर्म आणला. शॉर्ट व्हीडिओजमधून लोकांचं मनोरंजन केलं जातं. तसंच विविध प्रकारचे शॉर्ट व्हीडिओ तयार करणाऱ्यांनाही या APP मुळे प्रोत्साहन मिळालं. 12 कोटी युजर्ससह MOJ हे अॅप भारतीयांची पहिली पसंती ठरलं आहे. गेल्यावर्षी 29 जून 2020 रोजी मोदी सरकारने चायनीज App वर बंदी आणली त्यानंतर अवघ्या तीस तासांमध्ये हे अॅप सुरू झालं आणि या अॅपला चांगली प्रसिद्धीही मागच्या वर्षभरात मिळाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT