नागपूर : ३२ वर्षीय महिलेचा २५ वर्षाच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला; तरुणाची प्रकृती गंभीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

एका महिलेनं आपल्या २५ वर्षीय प्रियकरावर चाकूचे सपासप वार करत प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. दीड वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या महिलेनं प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तरुण लग्न करण्यास तयार होत नसल्यानं महिलेनं फ्लॅटवर जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर जिल्ह्यातील वाडी येथे प्रेयसीने प्रियकरावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. महिला आणि तरुणाचे दीड वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. महिलेचं नाव पूजा असून, पूजाचे २५ वर्षांच्या अक्षय सोबत मागील दीड वर्षांपासून प्रेम संबंध होत.

हे वाचलं का?

नागपूर : सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीकडून धक्कादायक खुलासा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

दरम्यान, पूजा अक्षयवर लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अक्षय त्वरित लग्नास तयार नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. काही दिवसांपूर्वी पूजाने अक्षयच्या आईला फोन करून ‘अक्षयने माझ्यासोबतची मैत्री तोडली असून, त्याने माझ्यासोबत लग्न केलं नाही, तर त्याचे वाईट परिणाम होतील’, अशी धमकी दिली होती.

ADVERTISEMENT

सोमवारी (१७ जानेवारी) संध्याकाळी संतापलेली पूजा दत्तवाडी परिसरात अक्षय राहत असलेल्या फ्लॅटवर गेली. तिथे गेल्यानंतर तिने अक्षयवर चाकूने हल्ला केला. रागाच्या भरात पूजाने अक्षयच्या मानेवर उजव्या बाजूला, डाव्या गालावर, मनगटावर, मांडी आणि पाठीवर चाकुने सपासप वार केले.

ADVERTISEMENT

संसार सुरळीत चालवण्यासाठी तो चोर बनला, नागपूर पोलिसांनी केली अटक

या चाकू हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. पूजाच्या हल्ल्यातून सुटका करून घेत तो एक किलोमीटरपर्यंत जखमी अवस्थेत चालत गेला. नंतर काही लोकांनी जखमी अक्षयला खाजगी रुग्णालयात दाखल केले. अक्षयची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर पूजा पळून गेली होती. पोलिसांनी आज (१८ जानेवारी) तिला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT