महिलेनं सात मुलांना दिला जन्म; डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का
अकल्पनीय घटना घडली की, त्यावर लवकर विश्वासच बसत नाही. अशीच एक घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. एका महिलेनं चक्क सात मुलांना जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती असताना महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी गर्भात पाच बालकं असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे डॉक्टरांही या घटनेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. ही घटना पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतातील एबटाबाद येथे घडली […]
ADVERTISEMENT
अकल्पनीय घटना घडली की, त्यावर लवकर विश्वासच बसत नाही. अशीच एक घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. एका महिलेनं चक्क सात मुलांना जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती असताना महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी गर्भात पाच बालकं असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे डॉक्टरांही या घटनेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत.
ADVERTISEMENT
ही घटना पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतातील एबटाबाद येथे घडली आहे. यार मोहम्मद नामक व्यक्तीच्या पत्नीने सात मुलांना जन्म दिला आहे. पत्नीला त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिन्ना आंतरराष्ट्रीय रुग्णालयात गर्भवतीला दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर महिलेची प्रसृती झाली. महिलेनं सात बाळांना जन्म दिल्यानंतर डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. यात चार मुलं आणि तीन मुली आहेत.
हे वाचलं का?
पत्नीने सात मुलांना जन्म दिल्याचं कळाल्यानंतर यार मोहम्मद यांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर सात मुलांचं पालन पोषण करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
बीबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना यार मोहम्मद म्हणाले, सात मुलांचं संगोपन करण्यात कसलीही अडचण येणार नाही. कारण आम्ही संयुक्त कुंटुंबात राहतो. कुटुंबातील सर्वच लोक मुलांच्या संगोपनासाठी मदत करतील. सात मुलांच्या आधी यार मोहम्मद हे आधीच दोन मुलींचे वडील आहेत. त्यामुळे त्यांचं कुटुंब आता 9 जणांचं झालं आहे.
ADVERTISEMENT
या प्रसूतीबद्दल डॉक्टर काय म्हणाले?
ADVERTISEMENT
डॉक्टारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 8 महिन्यांची गर्भवती महिला शनिवारी त्यांच्या रुग्णालयात आली होती. त्यावेळी महिलेची तपासणी करण्यात आली. तपासणी करताना महिलेच्या गर्भात पाच मुलं असल्याचं समजलं.
गर्भवती महिलेचं ब्लेड प्रेशर वाढलेलं होतं. पोटही फुगलं होतं. ऑपरेशन करून प्रसूती करणं धोकादायक होत, कारण यापूर्वी महिलेची दोनवेळा सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आलेली होती. पुन्हा सिझेरियन केलं तर जुने टाके आणि गर्भाशय फाटण्याचाच धोका होता, असं डॉक्टर म्हणाले.
मात्र, डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशन करून महिलेची प्रसूती केली. तब्बल तासभर ऑपरेशन चालल्यानंतर महिलेनं पाच मुलांना जन्म दिला. एकापेक्षा अधिक मुलं जन्माला येऊन सर्वच्या सर्व जगणं असं खुप क्वचित होतं. आमच्या टीमने हे प्रसूती यशस्वीपणे करून दाखवली, असं सांगत डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT