Dating App वर महिलेची भलतीच अट, तरूणही झाले शॉक!
महिलेने गर्लफ्रेंड (Girlfriend) बनवण्यासाठी इच्छूक असलेल्या तरूणांसाठी भलतीच अट ठेवली होती. या तिच्या अटीमुळे तरूणही शॉक झाले आहेत. दरम्यान महिलेच्या या डेटिंग अॅपवरील अटीमुळे ती चर्चेत आली आहे.
ADVERTISEMENT
Women Weird Condition Dating App : डेटिंग अॅपच्या (Dating App) माध्यमातून कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला डेट करता येते. अशाच एका अॅपवर एका महिलेने स्वत:च अकाऊंट बनवले होते. या अकाऊंटवर महिलेने गर्लफ्रेंड (Girlfriend) बनवण्यासाठी इच्छूक असलेल्या तरूणांसाठी भलतीच अट ठेवली होती. या तिच्या अटीमुळे तरूणही शॉक झाले आहेत. दरम्यान महिलेच्या या डेटिंग अॅपवरील अटीमुळे ती चर्चेत आली आहे.नेमकी तिने तरूणांसाठी काय अट ठेवली आहे? हे जाणून घेऊयात.(women weird condition dating app make me girlfriend write 500 word essay)
ADVERTISEMENT
कोण आहे महिला?
इंग्लंडच्या पोर्ट्समाऊथमध्ये राहणारी लॉरेन ही विवाहीत आहे.लॉरेनला एक मुलगी देखील आहे.लॉरेनचं लग्न 10 वर्षापुर्वीच तुटलं होतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ती सिंगल आयुष्य जगतेय. लॉरेन ही 36 वर्षांची आहे. तर स्किन केयर क्लिनिकमध्ये काम करते आहे. लॉरेन सध्या पार्टनरच्या शोधात आहे, त्यामुळे तिने डेटिंग अॅप (Dating App) Hinge वर प्रोफाईलवर अट घातली होती. या अटीमुळे ती सध्या तरूणांमध्ये चर्चेत आली आहे.
हे ही वाचा : ‘नवऱ्याने बेडरूममध्ये लावलाय CCTV कॅमेरा’, बायको म्हणाली; त्याला…
काय अट होती ?
लॉरेनने डेटिंग अॅप (Dating App) Hinge वर प्रोफाईवलवर बनवून भलतीट अट घातली आहे. जर मला गर्लफ्रेंड बनवायचे असेल आणि मला डेटवर घेऊन जायची इच्छा असल्यास एक अर्ज करावा लागेल. आणि 500 शब्दांचा निबंध लिहून द्यावा लागेल. लॉरेनसोबत डेटवर का जायचे?या विषयावर हा निबंध लिहायचा आहे. एकूणच तिचे म्हणणे आहे की, मला गर्लफ्रेंड बनवायचं असेल तर निबंध लिहा. या निबंधावरून ती तरूणासोबत डेटवर जायचंय की नाही हे ठरवणार आहे.
हे वाचलं का?
तरूणांचा प्रतिसाद कसा होता?
लॉरेनने भलतीच अट ठेवून देखील तिला डेटिंग अॅपवर (Dating App) चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबतचा अनुभव सांगताना लॉरेन म्हणते की, एका तरूणाने अर्जही केला आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले. लॉरेनला तरूणाचा हा अर्ज खुपच आवडला आणि ती डेटवर देखील गेली. दोघांची छान डेटही झाली पण त्यांचे नाते पुढे वाढू शकले नाही.
हे ही वाचा : स्वस्तात आयफोन घेणं पडलं महागात, पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
डेटिंग अॅपच्या (Dating App) माध्यमातून तरूणांसोबत नात्यात राहण्याचा माझा अनुभव फारसा असा चांगला नव्हता. काही डेट्स तर खुपच बोरींग होत्या,असा अनुभव लॉरेन सांगते. तसेच जरी ही अट मी एक थट्टा म्हणून ठेवली असली तरी तरूणांनी यासाठी खूप प्रयत्न केला आणि अर्ज देखील केला. तसेच या माध्यमातून एखाद्या तरूणाची मजेदार बाजू देखील पाहायला मिळाली. यामुळे त्यांना मी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकले. दरम्यान पुढे लॉरेन म्हणते की, डेटिंग अॅपपासून आता मी ब्रेक घेतला आहे. तसेच माझा आता पुरुषांवरचा विश्वास वाढतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT