नागपूरमध्ये चिंताजनक परिस्थिती, गेल्या 24 तासात ‘एवढ्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. पण यासोबतच आणखी एक चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृतांचा आकडा देखील तेवढाच झपाट्याने वाढत आहे. त्यातही एकट्या नागपूरमध्ये काल (8 एप्रिल) एका दिवसात तब्बल 73 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागपूरकर चांगलेच हादरले आहेत.

ADVERTISEMENT

गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 5514 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी 2,881 रुग्ण हे शहरी भागातील आहेत तर ,628 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय जे 73 मृत्यू झाले आहेत त्यातील 28 मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर 40 मृत्यू हे शहरी भागातील आहेत. आतापर्यंत एकट्या नागपुरात 4193 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा देखील वाढला, गेल्या 24 तासात किती नवे कोरोना रुग्ण सापडले

हे वाचलं का?

नागपूर प्रशासनाच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब म्हणजे नागपूरमध्ये सध्या 61,711 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान नागपूर प्रशासनासमोर असणार आहे.

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा देखील वाढला

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी होत नसताना आता प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडत चालली आहे. कारण आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा देखील वाढला आहे. कारण काल (8 एप्रिल) राज्यात तब्बल 376 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मागील 24 तासात राज्यात 56 हजार 286 नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे सध्या राज्यात 5 लाख 21 हजार 317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ADVERTISEMENT

‘ज्यांना राजकारण करायचंय ते करतच आहेत’, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींनी नेमका कोणाला हाणला टोला?

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास मुंबई पाठोपाठ पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 97 हजारांपेक्षा जास्त रूग्ण, मुंबईत 83 हजारांहून अधिक तर नागपुरात 61 हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील कोरोना अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई – 83 हजार 693

  • ठाणे- 69 हजार 993

  • पुणे- 97 हजार 242

  • नागपूर- 61 हजार 711

  • नाशिक- 34 हजार 919

  • अहमदनगर- 15 हजार 292

  • जळगाव- 8 हजार 212

  • औरंगाबाद- 18 हजार 082

  • लातूर – 9 हजार 355

  • नांदेड- 11 हजार 659

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT