सलमान रश्दींवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली, नाव आहे Hadi Matar; व्हेंटिलेटवर आहेत रश्दी
अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्लेखोराने चाकूने १५ वार केले. या घटनेनंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बफेलो या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्यांचं व्याख्यान सुरू होण्याआधी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर सलमान रश्दींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर्जरीही पार पडली आहे. सर्जरीनंतर ते एक […]
ADVERTISEMENT
अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्लेखोराने चाकूने १५ वार केले. या घटनेनंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बफेलो या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्यांचं व्याख्यान सुरू होण्याआधी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर सलमान रश्दींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर्जरीही पार पडली आहे. सर्जरीनंतर ते एक डोळा गमावू शकतात अशीही भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
सलमान रश्दी यांना बोलताही येत नाही ही बाबही आली समोर
रश्दी यांचे एक एजंट Andrew Wylie यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान रश्दी हे बोलू शकत नाहीत असंही समोर आलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सलमान रश्दी हे सर्जरी नंतर त्यांचा डोळा गमावू शकतात. एवढंच नाही तर त्यांच्या हाताच्या नसांनाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराने जो हल्ला केला त्यामुळे त्यांचं लिव्हर डॅमेज झालं.
न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान रश्दींवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. Hadi Mater असं या हल्लेखोराचं नाव आहे. या हल्लेखोरांने सलमान रश्दींच्या गळ्यावर, पोटात चाकूने वार केले. त्यानंतर सलमान रश्दी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती नाजूक आहे असंही सांगितलं जातं आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौटाउक्वामध्ये जी घटना घडली ती जवळपास मागच्या १५० वर्षात एकदाही घडलेली नाही.
हे वाचलं का?
सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला, कट्टर पंथीयांच्या निशाण्यावर का आहेत रश्दी?
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक सलमान रश्दींचं वादग्रस्त पुस्तक ठरलं
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक सलमान रश्दी यांनी लिहिलं. या पुस्तकामुळे त्यांच्याविषयी असे वाद निर्माण झाले जे वाद अजूनही त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत. १९८० च्या दशकात त्यांना या पुस्तकामुळे पहिल्यांदा ठार मारलं जाण्याची धमकी इराणहून मिळाली होती. हे पुस्तक ईश्वर निंदा करणारं आणि इस्लाम विरोधी आहे असा कट्टरपंथियांचा आक्षेप आहे. १९८८ मध्ये या पुस्तकावर इराणमध्ये बंदी घालण्यात आली मात्र कट्टर पंथियांच्या निशाण्यावर सलमान रश्दी तेव्हापासूनच आहेत.
ADVERTISEMENT
इराणमधून सलमान रश्दींविरोधात काय फतवा निघाला होता?
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिल्यानंतर जो वाद सलमान रश्दींविरोधात झाला त्यानंतर इराणहून त्यांच्या विरोधात फतवा निघाला. हा फतवा साधासुधा नव्हता. सलमान रश्दी यांना जो ठार मारेल त्याला ३० लाख डॉलर्सचं बक्षीस दिलं जाईल असा फतवा होता. इराण गणतंत्राचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खुमैनी यांनी सलमान रश्दींच्या विरोधात हा फतवा काढला होता. मात्र नंतर इराण सरकारने हा त्यांचा व्यक्तिगत मामला आहे असं म्हणत हात झटकले होते. यानंतर २०१२ मध्येही सलमान रश्दींना ठार करण्यासाठी इराणच्या एका धार्मिक संघटनेने फतवा काढला. या फतव्यात सलमान रश्दींना ठार मारणाऱ्यास ३३ लाख डॉलर्सचं बक्षीस दिलं जाई असं जाहीर करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT