यवतमाळमध्ये रूग्णसंख्या वाढत असताना खासगी रूग्णालयाकडून होतेय रूग्णांची लूट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसतंय. यवतमाळ जिल्हातही कोरोनाने कहर माजवलाय. दर दिवशी हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद केली जातेय. अशाच परिस्थितीत मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झालीये. रूग्णावर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी अनेकजण सरकारी रूग्णालयांऐवजी खाजगी रूग्णालयांमध्ये धाव घेतायत. याचाच गैरफायदा घेऊन खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांची लूट होत असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रुग्ण हवालदिल झाले पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी या खाजगी रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची लूट केली जात असल्याचा रूग्णांकडून आरोप केला जातोय. रूग्णांच्या या आरोपांनंतर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह

हे वाचलं का?

पुसद येथील विनायक शेवकर आणि त्यांच्या पत्नी असे दोघंही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. उपचारांसाठी मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी हॉस्पिटलने hrct केला आणि या hrct चे त्यांना प्रत्येकी 4 हजार रुपये लावण्यात आले. प्रत्यक्षात सरकारच्या निर्णयाप्रमाणे 2 हजार रुपये घेणं अपेक्षित होतं. शिवाय दोघांकडून एकाच रुमचे प्रति दिवस 7 हजार आणि 6 हजार रुपयांप्रमाणे पैसे घेण्यात आले.

याच रूग्णालयात रेमडिसीवर इंजेक्शनचे दरही जास्त लावण्यात आल्याचा आरोप शेवकर यांनी केलाय. यासोबतच शेवकर यांनी रुग्णालयकडून होत असलेली लूट थांबवण्यात यावी अशी मागणी केलीये.

ADVERTISEMENT

‘1 मे रोजी लसीच उपलब्ध झाल्या नाहीत तर…’ राजेश टोपे म्हणतात

ADVERTISEMENT

दुसरीकडे शेवकर यांच्याप्रमाणेच पुसद येथील शरद माईंद यांची आई सुद्धा मेडिकेअर मल्टीस्पेशालिटीमध्ये कोरोना वर उपचार घेत होती. त्यांना सुद्धा hrct चे 4 हजार रुपये लावण्यात आले. सध्या कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयात उपचार घेतायत. त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन रुग्णालय लूट करत आहे, तेव्हा या रुग्णालयवर कारवाई करून फसवणूक थांबवावी अशी मागणी केली जातेय. दरम्यान यासंदर्भात तक्रार करूनही जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT